वृक्षारोपणाची एक चळवळ निर्माण करा!

By Admin | Published: June 25, 2017 06:57 PM2017-06-25T18:57:45+5:302017-06-25T18:57:45+5:30

जास्तीत जास्त नागरिकांनी रोपे विक्री केंद्राला भेट द्यावी व सवलतीच्या दरात वृक्ष घेऊन वृक्षारोपणाची एक चळवळ निर्माण करावी, असे आवाहन यावेळी जिल्हाधिकार्‍यांनी केले.

Create a tree plantation movement! | वृक्षारोपणाची एक चळवळ निर्माण करा!

वृक्षारोपणाची एक चळवळ निर्माण करा!

googlenewsNext

जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडेय : रोपे आपल्या दारी उपक्रम : विक्री केंद्राचे उद्घाटन

अकोला : सर्व जिल्हय़ांत एकत्रित चार कोटी वृक्ष लागवड करून ती जोपासण्याचा व जिवंत ठेवण्याचा हिरवाकच संकल्प शासनाने केला आहे. या कार्यक्रमात सर्वसामान्य नागरिक, गृहनिर्माण संस्था व इतर संस्था यांचाही सहभाग राहावा, याकरिता शासनाने ह्यरोपे आपल्या दारीह्ण हा कार्यक्रम राबविण्याचा निर्णय घेतला. या कार्यक्रमांतर्गत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात सवलतीच्या दरात रोपे विक्री केंद्राचा शुभारंभ जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडेय यांच्या हस्ते झाला. जास्तीत जास्त नागरिकांनी रोपे विक्री केंद्राला भेट द्यावी व सवलतीच्या दरात वृक्ष घेऊन वृक्षारोपणाची एक चळवळ निर्माण करावी, असे आवाहन यावेळी जिल्हाधिकार्‍यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर रोपे विक्री केंद्र सुरू करण्यात आले आहे. या केंद्राच्या उद्घाटनप्रसंगी विभागीय वन अधिकारी विजय माने, केंद्राचे नियंत्रक तथा वन क्षेत्रपाल जी.डी. देशमुख व नागरिक उपस्थित होते. याप्रसंगी प्रातिनिधिक स्वरुपात जिल्हाधिकारी यांच्या हस्ते नागरिकांना रोपांचे वितरण करण्यात आले. त्यानंतर जिल्हाधिकारी यांनी अभिप्राय नोंदवहीत आपला अभिप्राय नोंदविला. रोपे आपल्या दारी या कार्यक्रमातंर्गत रोपे विक्री केंद्रांवरुन प्रत्येक घराकरीता ५ व प्रत्येक संस्थेकरीता २५ रोपे दिले जातील. दिनांक ५ जुलै २0१७ पयर्ंत रोपे विक्री सुरु राहणार आहे. १ ते ५ जुलै २0१७ या कालावधीत रोपे वन विभागामार्फत नागरिकांनी सांगितलेल्या ठिकाणापयर्ंत वृक्षमित्रांमार्फत मोफत पोहचविण्यात येतील. जिल्हय़ात या ठिकाणी आहेत रोप विक्री केंद्र अकोला येथे रोप विक्री केंद्र हे वनकुटी, अशोक वाटीकेसमोर, जिल्हाधिकारी कार्यालय आणि वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालय, सिंधी कॅम्प येथे आहेत. अकोट येथे वनपरिक्षेत्र अधिकारी (वन्यजीव) कार्यालय व तहसिल कार्यालय येथे रोप विक्री केंद्र आहे. मूर्तिजापूर येथे शिवाजी चौक व तहसिल कार्यालय येथे रोप विक्री केंद्र आहे. या प्रजातीची रोपे मिळणार खैर, पांगरा, अंजन, निम, काशिद, शिरस, करंज, विलायती चिंच, आवळा, चिंच, सिताफळ, शेवगा, जांभूळ, हादगा, वड, पिंपळ, बांबू, पिशवीतील साग रोपे, गुलमोहर, अमलतास, रेन ट्री, पेल्ट्रोफोरम, कांचन, बोगनवेल, क्रोटॉन, डयुरांटा, मोगरा, वड इत्यादी रोपे विक्रीसाठी उपलब्ध आहेत.

Web Title: Create a tree plantation movement!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.