३० वर्षात तयार केले ५० ‘बोन्साय’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2020 03:41 PM2020-07-26T15:41:17+5:302020-07-26T15:41:25+5:30

डॉ. अनिता तिडके यांनी चक्क आपल्या परसबागेत विविध जातीचे ५० च्यावर बोन्साय वृक्ष तयार केले आहेत.

Created 50 'Bonsai' in 30 years! | ३० वर्षात तयार केले ५० ‘बोन्साय’!

३० वर्षात तयार केले ५० ‘बोन्साय’!

Next

- संजय उमक  
लोकमत न्यूज नेटवर्क
मूर्तिजापूर : माणसाला आवड असली की सवड मिळते. आपल्या व्यस्त जीवनातून सवड काढत डॉ. अनिता तिडके यांनी चक्क आपल्या परसबागेत विविध जातीचे ५० च्यावर बोन्साय वृक्ष तयार केले आहेत. याच बरोबर त्या अनेक छंद जोपासतात.
अनेकदा काही गोष्टीचे प्रशिक्षण घ्यावे लागते, तर काही उपजतच माणसाच्या अंगी भिनल्या जातात. तर काहींना आपली आवड स्वस्थ बसू देत नाही. त्या आवडीनुसार वेळोवेळी आगळीकता निर्माण होत असते. असेच आगळ्यावेगळे प्रयोग करून, टाकून दिलेल्या पुरातन वस्तूपासून डॉ. अनिता तिडकेंनी विशेष वस्तूंची निर्मितीही केली आहे. डॉ. अनिता तिडके या टेक्सटाइलमध्ये एम एस्सी, पीएच.डी असून, गतवर्षी प्राध्यापिका म्हणून निवृत्त झाल्या आहेत. त्यामुळे त्या वस्त्र डिझाइनमध्ये पारंगत आहेत. त्यांनी आतापर्यंत अनेक कलात्मक वस्त्रप्रावरणेसुद्धा निर्माण केली आहेत. शिवाय नव्या पद्धतीने गालिचेसुद्धा तयार केले आहेत. भविष्यात त्या ज्येष्ठ कवी, चित्रकार विठ्ठल वाघ यांची ग्रामीण रेखाटने व वारली कला प्रकारातील चित्रे विणकामातून प्रस्तुत करणार असून, यातून अनेक महिलांना रोजगार उपलब्ध करून देण्याचा मानस ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केला. त्यांच्या बंगल्याचे इंटेरिअर वºहाडी खांब-चौक लामणदिव्यांनी घडविले आहेत. ज्याची दखल सुरेश द्वादशीवारांनी आपल्या एका सदरात आवर्जून घेतली होती. तिडके यांनी जोपासलेल्या बोन्साय संग्रहाची लोककवी विठ्ठल वाघ, वनस्पती शास्त्राचे तज्ज्ञ-अभ्यासक डॉ. सहदेव रोठे, डॉ. जयकिरण तिडके, डॉ. नानासाहेब चौधरी, बबन नाखले यांनी दाखल घेत आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या. त्याच बरोबर त्यांच्या घरातील झोपाळा, झुंबर, हंड्या आजही लक्ष वेधून घेतात. त्यांच्या विविध छंद, कलेने घराचा परिसर निश्चितच आकर्षून घेतो. बागेतील पारंपरिक पद्धतीने तयार करण्यात आलेले लाकडी फर्निचर काष्ठ कलेचा उत्तम नमुना आहे.


औदुंबर, वड, पिंपळाचा समावेश
अनिता तिडके यांच्या परसबागेत विशेषत: बोन्साय बागेत औदुंबर, संत्री, लिंबू, चिकू हे फळांनी बहरलेले आहेत. पारंब्या आलेले वड, पिंपळ, कडूनिंब, गुलमोहर, रंगबेरंगी फुलांचे ओडीनियम, असे पन्नासेक बोन्साय वृक्ष दिमाखात उभे आहेत. यातील काही २५ ते ३० वर्षांपूर्वीचे आहेत.

Web Title: Created 50 'Bonsai' in 30 years!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.