क्रिकेट क्लब मैदानावर अवतरली प्रतिदीक्षाभूमी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 1, 2017 02:12 PM2017-10-01T14:12:08+5:302017-10-01T14:13:12+5:30

The cricket club is on the radar of the horizon! | क्रिकेट क्लब मैदानावर अवतरली प्रतिदीक्षाभूमी !

क्रिकेट क्लब मैदानावर अवतरली प्रतिदीक्षाभूमी !

Next
ठळक मुद्देपुस्तके, प्रतिमांच्या साहित्याची रेलचेल


अकोला : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १४ आॅक्टोबर १९५६ रोजी समता, स्वातंत्र्य, बंधुत्व आणि मानवतेचा संदेश देणाºया बौद्ध धम्माची दीक्षा घेऊन धम्मक्रांती घडविली. या ऐतिहासिक घटनेला उजाळा देण्यासाठी समतेची मशाल हाती घेत बौद्ध बांधवांचा जनसागर अकोला क्रिकेट क्लब मैदानावर जमला.
आंबेडकरी जनतेसाठी धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा सोहळा एक मंगलमय पर्वणीच असते. आंबेडकरी युवकांच्या उत्साहाला उधाण येतं. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी, शहरातील आंबेडकरी जनतेकडून चौका-चौकांमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर, तथागत गौतम बुद्ध, महात्मा फुले यांच्या प्रतिमा आणि पुतळे उभारण्यात आले असून, शहरात जणू प्रतिदीक्षाभूमीच अवतरल्याचा भास होत होता. धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त शहरातील बुद्ध विहारांवर आकर्षक सजावट करण्यात आली. शहरातील अनेक भागांमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजनसुद्धा करण्यात आले आहे.
रविवारी दुपारपासून आंबेडकरी जनता अकोला क्रिकेट क्लब मैदानावर राष्ट्रीय नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांचे भाषण ऐकण्यासाठी एकत्र व्हायला लागली. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नातू म्हणून आंबेडकरी जनता अ‍ॅड. प्रकाश आंबेडकरांकडे एक बहुजन नायक म्हणून पाहते. बुधवारी शेकडोंच्या संख्येने जत्थेच्या जत्थे अकोला क्रिकेट क्लब मैदानावर येत आहेत. परिसराला यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले आहे. अकोला क्रिकेट क्लब मैदानाकडे येणारे चारही बाजूचे रस्ते आंबेडकरी जनतेच्या गर्दीने फुलून गेले . ‘जय भीम’चा जयघोष करीत, जिल्हाभरातून ट्रॅक्टर, आॅटोरिक्षा, ट्रकसह इतर वाहनांमधून हजारो आंबेडकरी अनुयायी क्रिकेट क्लब मैदानावर दाखल होत होते. क्रिकेट क्लब मैदानावर विविध साहित्याची दुकाने थाटण्यात आली होती. खाद्यपदार्थांपासून ते पुस्तकांपर्यंतचे स्टॉल या ठिकाणी आहेत.

 

Web Title: The cricket club is on the radar of the horizon!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.