राज्यस्तरीय शालेय क्रिकेट स्पर्धा; अमरावती विभागीय क्रिकेट संघ रवाना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2018 04:13 PM2018-11-18T16:13:53+5:302018-11-18T16:15:13+5:30
अकोला: क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत पालघर (मुंबई) येथे १९ नोव्हेंबर पासून सुरू होणाऱ्या १९ वर्षाआतील शालेय क्रिकेट स्पर्धेकरिता अमरावती विभागीय क्रिकेट संघ कर्णधार आकाश राउतच्या नेतृत्वात शनिवारी सायंकाळी मुंबईकडे रवाना झाला.
अकोला: क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत पालघर (मुंबई) येथे १९ नोव्हेंबर पासून सुरू होणाऱ्या १९ वर्षाआतील शालेय क्रिकेट स्पर्धेकरिता अमरावती विभागीय क्रिकेट संघ कर्णधार आकाश राउतच्या नेतृत्वात शनिवारी सायंकाळी मुंबईकडे रवाना झाला. याप्रसंगी अकोला रेल्वेस्थानकावर राज्याचे नगर विकास,गृहराज्य मंत्री तथा अकोला जिल्हयाचे पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील ,डवले कॉलेजचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश डवले यांची विशेष उपस्थिती होती.
डवले कनिष्ठ महाविद्यालय क्रिकेट संघ राज्यस्तरावर अमरावती विभागाचे प्रतिनिधीत्व करणार आहे. संघामध्ये कर्णधार आकाश राऊत, संकेत डिक्कर, रेहान ठेकीया,पियुश सावरकर,प्रणव कठळकर,अभिषेक शेकरवार,क्रांती अलोणे,यश ठाकरे,विराज मिसाळे,साकेत दुतोंडे,प्रेम विंचनकर,श्यामल निखाडे, संघ व्यवस्थापक प्रा.सागर लोखंडे, प्रा.मेसरे यांचा समावेश आहे. क्रिकेट स्पर्धेत यशस्वी व्हा, यशवंत व्हा,विजयी व्हा आणि आपल्या अमरावती विभागाचा राज्याच्या क्रीडा व शैक्षणिक क्षेत्रात नावलौकीक वाढवा अशा शुभेच्छा डॉ. पाटिल यांनी संघाला दिल्या. याप्रसंगी डॉ.साबीर कमाल,लियाकतअली मिरसाहेब यांच्यासह डवले महाविद्यालयाचा कर्मचारी वर्ग, पालकवर्ग उपस्थित होते.