पाच काेचिंग क्लासेसच्या संचालकांसह १० जणांविरुध्द गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2021 04:19 AM2021-01-20T04:19:38+5:302021-01-20T04:19:38+5:30
अकाेला : महावितरण कंपनीच्या खांबांवर जाहिरातींचे फलक लावून शहराचे विद्रुपीकरण करणे तसेच नागरिकांच्या जीवाशी खेळणाऱ्या शहरातील पाच कोचिंग क्लासेसच्या ...
अकाेला : महावितरण कंपनीच्या खांबांवर जाहिरातींचे फलक लावून शहराचे विद्रुपीकरण करणे तसेच नागरिकांच्या जीवाशी खेळणाऱ्या शहरातील पाच कोचिंग क्लासेसच्या संचालकांसह दहा प्रतिष्ठांनाविरुद्ध महावितरण अधिकाऱ्यांच्या तक्रारीवरून सिव्हिल लाइन्स पोलिसांनी मंगळवारी गुन्हे दाखल केले आहेत.
शहरात महावितरण कंपनीचे खांब मोठ्या प्रमाणात आहेत. रस्ता दुभाजकाच्या मधोमध असलेल्या खांबांवर तसेच रस्त्याच्या कडेला असलेल्या खांबांवर शहरातील काेचिंग क्लासचे संचालक तसेच विविध प्रतिष्ठानच्या संचालकांनी जाहिरातीचे फलक लावण्याची स्पर्धा सुरू केली आहे. वारंवार सूचना देऊनही बेशिस्तपणे वागणाऱ्या संस्थांवर कारवाईची माेहीमच महावितरणने सुरू केली आहे. सिव्हिल लाइन्स परिसरातील मॅथेमॅटिक्स ॲकेडमी, चौधरी क्लासेस, शुअर सक्सेस क्लासेस, एम स्क्वेअर ट्युटोरिअल या कोचिंग क्लासेसविरुद्ध तसेच वर्षा मोटर्स, बाँड करिअर इन्स्टिट्युट, एकता ज्वेलर्स, विद्या विहार संस्था, सरकार इन्टरप्राइजेस, मस्तानी कॅफे यांनी त्यांच्या प्रतिष्ठानांच्या जाहिरातीचे फलक विद्युत खांबावर लावले होते. त्यांच्याविरुद्ध सहायक अभियंता अनिरुद्ध चावरे यांच्या तक्रारीवरून कलम १३८,१४० विद्युत अधिनियम २००३, कलम ३ विद्रुपास प्रतिबंध अधिनियम १९९५ तसेच कलम ३ (१) शासकीय मालमत्ता हानी प्रतिबंधक अधिनियम १९८४ नुसार गुन्हे दाखल केले आहेत.