होमीओपॅथी मेडीकल कॉलेजच्या अध्यक्षासह संचालकांविरुध्द गुन्हा
By admin | Published: March 17, 2017 08:48 PM2017-03-17T20:48:21+5:302017-03-18T02:26:58+5:30
बुलडाणा जिल्ह्यातील विद्यार्थिनीची अडीच लाखांनी फसवणूक.
अकोला - आकोट रोडवरील होमीओपॅथीक मेडीकल कॉलेजचे अध्यक्ष किशोर पिंपरकर, सचिव जयप्रकाश जयस्वाल, प्राचार्य डॉ. संजय तिवारी आणि संचालक तिलकराज सरनायक यांनी संगनमताने बुलडाणा जिल्हयातील एका विद्यार्थीनीला बीएचएमएसच्या प्रथम वर्षाला प्रवेश देउन त्यानंतर तीला अडीच लाख रुपयांनी गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार शुक्रवारी उजेडात आला. या प्रकरणी रामदास पेठ पोलिसांनी या चारही ठगबाजांविरुध्द फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. बुलडाणा जिल्हयातील कोलद येथील रहिवासी अश्वीनी शहादेव जाधव या विद्यार्थीनीने अकोट रोडवरील होमीओपॅथी मेडीकल कॉलेजमध्ये मॅनेजमेंट कोटयातून सुमारे दोन लाख ५० हजार रुपये देउन २६ जुन २०१६ रोजी प्रवेश घेतला होता. प्रवेश घेतेवेळी होमीओपॅथी मेडीकल कॉलेजचे अध्यक्ष किशोर मोरेश्वर पिंपरकर, सचिव जयप्रकाश महावीरलाल जयस्वाल, प्राचार्य डॉ. संजय तिवारी आणि संचालक तिलकराज गोवींदराव सरनायक यांनी सदर विद्यार्थीनी व तीच्या वडीलांना ३० जुन २०१६ रोजी २ लाख ५० हजार रुपयांमध्ये तुमचा प्रवेश निश्चीत झाल्याचे सांगीतले होते. या व्यतीरीक्त कोणतेही शुल्क लागणार नसल्याचेही त्यांनी या विद्यार्थीनीला प्रवेश देतांना स्पष्ट केले, त्यामूळे या विद्यार्थीनीने सर्व मुळ दस्तावेज आणि अडीच लाख रुपये जमा करून प्रवेश निश्चीत केला. त्यानंतर ५ जुलै रोजी कॉलेजचे इन्स्पेक्शन झाल्यानंतर मान्यता रद्द करण्यात आली, हा प्रकार विद्यार्थीनीच्या लक्षात येताच तीने संचालक व अध्यक्षासह प्राचार्यांशी संपर्क साधला असता त्यांनी असे काहीही झाले नसल्याचे सांगीतले. मात्र लगेच ७ नोव्हेंबर २०१६ रोजी सदर विद्यार्थीनी व तिच्या वडीलांना महाविद्यालयात बोलावून ५ लाख रुपयांशिवाय प्रवेश निश्चीत होणार नसल्याचे सांगीतले. ठरल्यानूसार अडीच लाखांमध्ये प्रवेश निश्चीत झाल्यानंतर होमीओपॅथीक मेडीकल कॉलेजच्या संचालकांनी अचाणकच पाच लाख रुपयांची मागणी केल्याने विद्यार्थीनी माणसिक दडपनात आली. त्यानंतर वारंवार कॉलेजमध्ये भेट घेण्याचा प्रयत्न केला असतांना अध्यक्ष, सचिव व संचालकांनी त्यांना टाळले, अडीच लाख रुपयांनी गंडा घातला तसेच विद्यार्थीनीचे एक वर्ष व्यर्थ गेल्यानंतरही कॉलेज प्रशासनाने त्यांना प्रवेश निश्चीत केला नाही. त्यामूळे आर्थिक आणि शैक्षणिक नुकसान झालेल्या विद्यार्थीनीने या प्रकरणाची तक्रार रामदास पेठ पोलिस ठाण्यात केली. यावरुन अध्यक्ष किशोर पिंपरकर, सचिव जयप्रकाश जयस्वाल, प्राचार्य डॉ. संजय तिवारी आणि संचालक तिलकराज सरनायक यांच्याविरुध्द फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.