अकोला: कंपनीची दहा लाखांनी फसवणुक करणार्‍या चौघांविरूद्ध गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2017 10:51 PM2017-12-22T22:51:18+5:302017-12-22T22:53:42+5:30

अकोला: कंपनीमध्ये नोकरीला असताना, संगनमताने, लोकांकडून बचत गट योजनेतर्गंत कंपनीला  मिळालेल्या पैशांची अफरातफर करून आणि बनावट कागदपत्र तयार करून १0 लाख रूपयांनी  फसवणुक केल्याने, खदान पोलिसांनी चौघा जणांविरूद्ध शुक्रवारी रात्री गुन्हा दाखल केला.

The crime against four companies cheating the company's ten million fraud | अकोला: कंपनीची दहा लाखांनी फसवणुक करणार्‍या चौघांविरूद्ध गुन्हा

अकोला: कंपनीची दहा लाखांनी फसवणुक करणार्‍या चौघांविरूद्ध गुन्हा

Next
ठळक मुद्दे पैशांची अफरातफर व बनावट कागदपत्र तयार करून १0 लाख रूपयांनी फसवणूक

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला: कंपनीमध्ये नोकरीला असताना, संगनमताने, लोकांकडून बचत गट योजनेतर्गंत कंपनीला  मिळालेल्या पैशांची अफरातफर करून आणि बनावट कागदपत्र तयार करून १0 लाख रूपयांनी  फसवणुक केल्याने, खदान पोलिसांनी चौघा जणांविरूद्ध शुक्रवारी रात्री गुन्हा दाखल केला.
अमरावती येथे राहणारे सेटीन क्रेडिट केअर नेटवर्क लि. आझादपुर(नवी दिल्ली) कंपनीचे जनरल  मॅनेजर शहबाज अहमद सरफराज अहमद(३६) यांच्या तक्रारीनुसार आरोपी नरेश सुरेश पाचोडे (रा.आमदरी जि. अमरावती), प्रदीप मुरलीधर अहिर(रा. पोहरादेवी जि. वाशिम), हनुमान  तुकाराम बर्वे(रा. कन्हेरगाव नाका जि. हिंगोली) आणि अमित लक्ष्मण मोहोड(रा. तळवेल जि.  अमरावती) यांनीसेटीन क्रेडिट केअर नेटवर्क लि. आझादपुर(नवी दिल्ली) कंपनीत नोकरी करीत  असताना,  संगनमत करून बचत गट योजनेतर्गंत लोकांकडून पैसा जमा करून कंपनीच्या पैशांची  अफरातफर केली आणि बनावट कागदपत्रे तयार करून कंपनीची ८ ते १0 लाख रूपयांनी  फसवणुक केली. मॅनेजर शहबाज अहमद यांच्या तक्रारीनुसार खदान पोलिसांनी आरोपींविरूद्ध  भादंवि कलम ४२0, ४0८, ४६८, ४७१(३४) नुसार गुन्हा दाखल केला. 

Web Title: The crime against four companies cheating the company's ten million fraud

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.