मुलीवर मातृत्व लादणा-या युवकाविरुद्ध गुन्हा

By admin | Published: March 10, 2017 02:33 AM2017-03-10T02:33:24+5:302017-03-10T02:33:24+5:30

जुने शहर पोलिसांनी आरोपीला अटक केली

Crime against a girl who is mother-in-law | मुलीवर मातृत्व लादणा-या युवकाविरुद्ध गुन्हा

मुलीवर मातृत्व लादणा-या युवकाविरुद्ध गुन्हा

Next

अकोला, दि. ९- डाबकी गावातील एका १७ वर्षीय मुलीला प्रेमाच्या जाळय़ात अडकवून तिच्यासोबत शरीरसंबंध प्रस्थापित करून तिच्यावर मातृत्व लादणार्‍या युवकाविरुद्ध डाबकी रोड पोलिसांनी गुरुवारी सायंकाळी गुन्हा दाखल केला. पोलिसांनी आरोपीला अटक केली. मुलीने दिलेल्या तक्रारीनुसार ती डाबकी रोड परिसरातील महाविद्यालयात शिक्षण घेत आहे. महाविद्यालय परिसरात शेख शफीक शेख बशीर हा दररोज थांबायचा. नियमित या ठिकाणी येऊन तो मुलीला न्याहाळायचा. एके दिवशी शेख शफीकने मुलीला अडवून मी तुझ्यावर जिवापाड प्रेम करतो, असे सांगितले; परंतु मुलीने त्याला प्रतिसाद दिला नाही. त्यानंतरही त्याने मुलीचा नाद सोडला नाही. त्याने सतत तिचा पिच्छा पुरविला. त्याच्या सततच्या पाठलागामुळे मुलीने त्याच्या प्रेमाला होकार दिला. त्यानंतर प्रेमाच्या आणाभाका घेऊन मुलीला विश्‍वासात घेतले आणि तिच्यासोबत शेख शफीक लगट करू लागला. त्यानंतर आरोपी तिला शहराबाहेर मोटारसायकलवर घेऊन जाऊ लागला. त्याने मुलीसोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले. लग्नाचे आमिष दाखवून आरोपी शफीक हा तिच्यावर सातत्याने अत्याचार करीत होता. यातून मुलीला गर्भधारणा झाली. ही बाब मुलीने प्रियकर शेख शफीकला सांगितली; परंतु त्याने स्पष्ट शब्दात तिच्यासोबत लग्न करण्यास नकार दिला. अखेर मुलीने गुरुवारी सायंकाळी डाबकी रोड पोलीस ठाणे गाठून प्रियकराविरुद्ध तक्रार दिली. तिच्या तक्रारीनुसार पोलिसांनी आरोपीविरुद्ध भादंवि कलम ३७६, पॉस्को, ३, ४ नुसार गुन्हा दाखल केला. आरोपीला अटक करण्यात आली असून आरोपी शेख शफीक याला शुक्रवारी दुपारी न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे. पुढील तपास ठाणेदार विनोद ठाकरे करीत आहेत.

Web Title: Crime against a girl who is mother-in-law

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.