पत्रकारावर हल्ला करणाऱ्या वाळू तस्कारांविरुद्धच्या गुन्ह्यात वाढ!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 06:12 AM2021-02-05T06:12:30+5:302021-02-05T06:12:30+5:30
पांढुर्णा येथील पत्रकार अमोल सोनोने यांनी अंधारसांगवी परिसरातील निर्गुणा नदीपात्रातून रेतीचे उत्खनन करून अवैध वाहतूक सुरू असल्याचे वृत्त ...
पांढुर्णा येथील पत्रकार अमोल सोनोने यांनी अंधारसांगवी परिसरातील निर्गुणा नदीपात्रातून रेतीचे उत्खनन करून अवैध वाहतूक सुरू असल्याचे वृत्त लोकमत'मध्ये १७ जानेवारी रोजीच्या अंकात प्रकाशित करताच, परिसरातील रेतीमाफियांचे पित्त खवळले. अमोल सोनोने पांढुर्णा-मळसूर फाट्यावर १८ जानेवारी रोजी सकाळी गेले असता, आलेगाव येथील रेतीमाफिया तिघांनी त्यांना लाथाबुक्की अणि काठीने मारहाण करून जखमी केले. तसेच जातीवाचक शिवीगाळ केली. सोनोने यांनी चान्नी पोलीस स्टेशन गाठून तक्रार दिली. पोलिसांनी आलेगाव येथील आरोपी सचिन करपे, रामेश्वर डाखोरे, आकाश मुळे या तिघांविरुद्ध ॲट्रॉसिटी ॲक्ट व भादंवि कलम ३२४, ५०६, ५०४, व ३४ नुसार गुन्हा दाखल करून अटक केली होती. पुढील तपास डीवायएसपी राम कदम, संजय वानखडे करीत आहेत. पत्रकार कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते. त्यानुसार आरोपींच्या गुन्ह्यात वाढ करण्यात आली.