समाजकल्याण अधिकारी ढगे यांच्याविरूद्ध गुन्हा

By admin | Published: March 20, 2015 12:49 AM2015-03-20T00:49:05+5:302015-03-20T00:49:05+5:30

तक्रारकर्त्याला मारहाण करून जातीवाचक शिवीगाळ केल्याचे प्रकरण.

Crime Against Social Welfare Officer Dhage | समाजकल्याण अधिकारी ढगे यांच्याविरूद्ध गुन्हा

समाजकल्याण अधिकारी ढगे यांच्याविरूद्ध गुन्हा

Next

बुलडाणा : माहिती अधिकाराच्या प्रकरणात सुनावणी दरम्यान समाजकल्याण आयुक्त नितीन ढगे यांनी तक्रारकर्त्याला मारहाण करून जातीवाचक शिवीगाळ गेल्याप्रकरणी पोलिसांनी अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत नितीन ढगे यांच्या विरूद्ध गुन्हा दाखल केला. शिवाजी शिक्षण संस्थेच्या जिल्ह्यातील पाच वसतिगृहामध्ये झालेली पदभरती बेकायदेशीर असल्याची तक्रार विलास खंडेराव यांनी केली होती. या प्रकरणाची ३१ जानेवारी २0१५ रोजी जिल्हा परिषद समाजकल्याण अधिकार्‍याच्या दालनात सुनावणी सुरू होती. सुनावणी झाल्यानंतर तक्रारकर्ते खंडेराव यांना ढगे यांनी परत बोलावले व तुम्ही तक्रार मागे घ्या, असे म्हणून जातीवाचक शिवीगाळ करून मारहाण केली, अशी तक्रार खंडेराव यांनी पोलीस स्टेशनला केली होती. या तक्रारीवरून आज १९ मार्च रोजी बुलडाणा पोलिसांनी समाजकल्याण अधिकारी नितीन ढगे व जाधव यांच्या विरूद्ध कलम ३२३, ५0४, ५0६ सह अनुसूचित जाती अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा १९८९ कलम ३(१)(१0)४ नुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास ठाणेदार तांदळे करीत आहे.

Web Title: Crime Against Social Welfare Officer Dhage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.