शेतकर्याची फसवणूक करणार्या व्यापार्याविरुद्ध गुन्हा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2017 11:37 PM2017-11-20T23:37:05+5:302017-11-20T23:47:08+5:30
हिवरखेड: सौंदळा येथील शेतकर्याचा कापूस घेऊन पोबारा करणार्या व्यापार्याविरुद्घ हिवरखेड पोलिसांनी २0 नोव्हेंबर रोजी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. कापसाच्या चुकार्यापोटी ८८ हजार रुपये व्यापार्याने दिलेच नसल्याचे समोर आले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिवरखेड: सौंदळा येथील शेतकर्याचा कापूस घेऊन पोबारा करणार्या व्यापार्याविरुद्घ हिवरखेड पोलिसांनी २0 नोव्हेंबर रोजी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. कापसाच्या चुकार्यापोटी ८८ हजार रुपये व्यापार्याने दिलेच नसल्याचे समोर आले आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सौंदळा येथील अनेकचंद बन्सीलाल शर्मा याने गावातील श्यामसुंदर रामकरण भट्टड यांच्याजवळून २0 क्विंटल ३५ किलो कापूस ४,३५0 रु. प्रतिक्विंटल या दराने ५ नोव्हेंबर रोजी विकत घेतला. तसेच शर्मा याने मेटॅडोर क्र. एम.एच. १३ जी ६१९३ या वाहनाने सदर कापूस घेऊन गेला. ५ तारखेपासून पैशांसाठी तगादा लावला असता कॅशलेस व्यवहार सुरू असल्याने दोन दिवसांमध्ये देतो, असे सांगितले; परंतु ८८ हजार ५00 रु. च्या कापसाचे पैसे दिले नाहीत. त्याच्या घरी गेले असता त्याचे घर बंद अवस्थेत आढळल्याने त्याने गावातून पोबारा केल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे निदर्शनास येताच शेतकरी श्यामसुंदर रामकरण भट्टड यांनी हिवरखेड पोलीस स्टेशन गाठून फिर्याद दिली. त्यांच्या फिर्यादीवरून आरोपी अनेकचंद बन्सीलाल शर्मा याच्याविरुद्ध हिवरखेड पोलिसांनी भादंवि कलम ४२0, ४0९ विरुद्ध गुन्हा दाखल केला. तपास ठाणेदार विकास देवरे पीएसआय शरद भस्मे, गोपाल चव्हाण, आकाश राठोड करीत आहेत.