उमेश राठीसह चौघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2017 01:53 AM2017-09-25T01:53:01+5:302017-09-25T01:53:06+5:30
अकोला : खोलेश्वर येथील एका महिलेसोबत गीतानगरमधील फ्लॅट खरेदी-विक्रीचा व्यवहार करून दुसर्याच्याच नावाचे खोटे धनादेश दिल्याप्रकरणी उमेश राठीसह चौघांविरुद्ध सिव्हिल लाइन्स पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. उमेश राठीने अशाप्रकारे अनेकांना गंडा घातल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : खोलेश्वर येथील एका महिलेसोबत गीतानगरमधील फ्लॅट खरेदी-विक्रीचा व्यवहार करून दुसर्याच्याच नावाचे खोटे धनादेश दिल्याप्रकरणी उमेश राठीसह चौघांविरुद्ध सिव्हिल लाइन्स पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. उमेश राठीने अशाप्रकारे अनेकांना गंडा घातल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
रणपिसेनगरातील रहिवासी उमेश राठी, कल्पना राठी, शेष राठी व मोना राठी या चार जणांनी खोलेश्वर येथील रहिवासी राजकुमारी श्रीकांत तिवारी या महिलेला गीतानगरातील एक फ्लॅट दाखविला. सदर फ्लॅट राजकुमारी तिवारी यांना पसंत पडल्यानंतर २0१६ मध्ये आठ लाख रुपयांमध्ये व्यवहार पक्का झाला. तिवारी यांनी खरेदी-विक्रीचा व्यवहार करण्याचा प्रयत्न केला असता, उमेश राठी याने फ्लॅटचा ताबा दिला नाही. खरेदी-विक्रीची तयारी केल्यानंतरही उमेश राठी व्यवहार करण्यासाठी पुढे येत नव्हता. तिवारी यांनी आठ लाख रुपयांची रक्कम दिल्यानंतरही उमेश राठी, कल्पना राठी, शेष राठी व मोना राठी या चार जणांनी फसवूणक सुरू केल्याचे राजकुमारी तिवारी यांच्या लक्षात आले. त्यामुळे त्यांनी दिलेली आठ लाख रुपयांची रक्कम परत मागितली. मात्र, या चार जणांनी ही रक्कम परत न करता तिवारी यांना चार धनादेश दिले. यामधील एक धनादेश तिवारी यांनी १९ जुलै २0१७ रोजी बँकेत वटविण्यासाठी दिला असता, तो बाउन्स झाला. त्यानंतर अन्य तीन धनादेशाची तपासणी केली असता, यामधील दोन धनादेश हे दुसर्याच व्यक्तीच्या नावावर असल्याचे समोर आले. तत्पूर्वी उमेश राठी व कल्पना राठी, शेष राठी व मोना राठी या चार जणांनी तिवारी यांनी मारहाण केल्याची पोलिसांना माहिती दिली. सिव्हिल लाइन्स पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास केला असता, उमेश राठी, कल्पना राठी, शेष राठी व मोना राठी या चार जणांनी तिवारी यांना आठ लाख रुपयांनी गंडविल्याचे समोर आले. त्यानंतर रविवारी राजकुमारी तिवारी यांच्या तक्रारीवरून उमेश राठी, कल्पना राठी, शेष राठी व मोना राठी या चार जणांविरुद्ध भारतीय दंड विधानच्या कलम ४२0, ४७१, ३२४, ५0४, ५0६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ऑटोमोबाइल संचालकांना कोट्यवधींचा गंडा
अशाच प्रकरणात एका प्रकरणामध्ये शहरातील ऑटोमोबाइल्स संचालकांना हिशेबासाठी घरी बोलावून त्यांना बंदूक लावून जीवे मारण्याची धमकी दिली, महिलांचा विनयभंग केला, अशा खोट्या प्रकरणातही अडकविण्याचा प्रयत्न उमेश राठीने यापूर्वी केला असल्याचे ्रपकरणा पोलिसात गेले होते. त्यावेळी सिव्हिल लाइन्सचे ठाणेदार घनश्याम पाटील यांनी सखोल तपास केला असता, प्रकरण वेगळेच असल्याचे उजेडात आले. त्यानंतर असाच प्रयत्न त्याने शनिवारीही खोलेश्वर येथील महिलेसोबत केला. मात्र, सिव्हिल लाइन्स पोलिसांनी योग्य तपास केल्यानंतर हे फसवणुकीचे प्रकरण उजेडात आले.
आत्महत्येची नाटकबाजी प्रसिद्ध
उमेश राठी याने अनेकांना अशाप्रकारे गंडा घातला असून, पैसे मागण्यासाठी येताच, पैशावाल्यांच्या छळापायी विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची बोलबाला राठीचे कुटुंबीय करतात. यामुळे राठीकडे असलेले पैसे न मागणे हाच एक पर्याय राहतो. राठीच्या अशा अफलातून प्रतापामुळे अनेकांनी लाखो रुपयांची रक्कम अशाच प्रकारे सोडल्याची माहिती पोलिसांकडून प्राप्त झाली आहे.
या प्रकरणामध्ये सखोल तपास केल्यानंतर उमेश राठीसह त्याच्या कुटुंबीयांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राठीने अनेकांना गंडा घातल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे सदर प्रकरणाचा आणखी सखोल तपास करण्यात येणार आहे. उमेश राठीने आणखी कुणाला फसविले असल्यास त्यांनी तक्रारीसाठी पुढे यावे.
- अन्वर शेख
ठाणेदार सिव्हिल लाइन्स अकोला.