महिलेविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा
By admin | Published: June 20, 2017 04:46 AM2017-06-20T04:46:41+5:302017-06-20T04:46:41+5:30
पोलिसांनी अखेर सोमवारी पोलिसांनी महिलेवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला: अकोट फैल येथील रहिवासी तसेच आरोग्य कर्मचार्याच्या मुलाचा ३ जून रोजी विष प्राशन केल्याने मृत्यू झाला होता. या प्रकरणाचा सिटी कोतवाली पोलिसांनी तपास सुरू केल्यानंतर प्रेमसंबंध असलेल्या महिलेनेच त्याच्यावर जास्त दबाव आणल्याने त्याने विष प्राशन करून आत्महत्या केल्याचे तपासात समोर आले. त्यानंतर पोलिसांनी अखेर सोमवारी पोलिसांनी महिलेवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. कुणाल दीपक सांगळे याचे वडील दीपक सांगळे यांनी सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात यमुनाबाई जाधव या महिलेवर आरोप करीत तिच्यावर संशय घेतला होता; मात्र पोलिसांनी या प्रकरणी यमुनाबाईला ताब्यात घेऊन तिची सखोल चौकशी केली होती. कुणालच्या मृत्यूला तीच जबाबदार असल्याचा आरोप ठेवत पोलिसांनी तिच्याविरुद्ध भादंवि ३0६ नुसार (आत्महत्येच प्रवृत्त करणे) गुन्हा दाखल केला आहे. कुणालचे लग्न ठरल्याने या दोघांत भांडण झाले होते. त्यानंतर हातावर ब्लेडही मारून घेतल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली आहे.