शेतकऱ्यांच्या खात्यातील रक्कम कर्जखात्यात जमा केल्यास फौजदारी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 7, 2018 02:53 PM2018-06-07T14:53:10+5:302018-06-07T14:53:10+5:30
अकोला : पीक विमा आणि नैसर्गिक आपत्ती अंतर्गत शासनाकडून व विमा कंपनीमार्फत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आलेली रक्कम, शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यात जमा केल्यास संंबंधित बँक अधिकाऱ्यांना जबाबदार धरुन, त्यांच्याविरुद्ध फौजदारी कारवाई करण्यात येणार असल्याचा आदेश जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी बुधवारी जिल्ह्यातील बँकांना दिला.
- संतोष येलकर
अकोला : पीक विमा आणि नैसर्गिक आपत्ती अंतर्गत शासनाकडून व विमा कंपनीमार्फत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आलेली रक्कम, शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यात जमा केल्यास संंबंधित बँक अधिकाऱ्यांना जबाबदार धरुन, त्यांच्याविरुद्ध फौजदारी कारवाई करण्यात येणार असल्याचा आदेश जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी बुधवारी जिल्ह्यातील बँकांना दिला.
पीक विमा तसेच नैसर्गिक आपत्ती अंतर्गत शासनाकडून आणि विमा कंपनीकडून प्राप्त होणाºया अनुदानाची रक्कम शेतकºयांच्या बँक खात्यात जमा करण्यात येते. शेतकºयांच्या खात्यात जमा करण्यात आलेली रक्कम संबंधित शेतकºयांच्या कर्ज खात्यात जमा करण्यात येऊ नये, असे शासनाचे सक्त आदेश आहेत; परंतु जिल्ह्यातील काही बँकांमध्ये शासनाकडून व विमा कंपनीकडून शेतकºयांच्या खात्यात जमा करण्यात आलेली अनुदानाची रक्कम शेतकºयांच्या कर्ज खात्यात वर्ग करण्यात येत असल्याच्या तक्रारी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्राप्त होत आहेत. त्यामुळे जिल्ह्यात शासनाकडून आणि विमा कंपनीकडून शेतकºयांच्या खात्यात जमा करण्यात आलेली रक्कम शेतकºयांच्या कर्ज खात्यात वर्ग करण्यात आल्यास, त्यासंदर्भात संबंधित बँक अधिकाºयांना जबाबदार ठरवून, त्यांच्याविरुद्ध फौजदारी कारवाई करण्यात येणार आहे, असा आदेश जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी जिल्ह्यातील बँकांना दिला आहे.
शासन निर्देशाकडे दुर्लक्ष; ही शोभणारी बाब नाही!
शेतकºयांच्या खात्यात जमा करण्यात आलेली अनुदानाची रक्कम कर्ज खात्यात वर्ग करण्यात येऊ नये, असे शासनाचे सक्त निर्देश असताना, शेतकºयांच्या खात्यात जमा करण्यात आलेली रक्कम कर्ज खात्यात वर्ग करण्यात येत असल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. तक्रारी गंभीर स्वरुपाच्या असून, अशा कार्यप्रणालीमुळे शासन निर्देशाच्या अंमलबजावणीकडे हेतुपुरस्सर दुर्लक्ष करण्यात येत असल्याचे दिसून येते. अशा वर्तणुकीमुळे शेतकरी वर्गात शासनाची प्रतिमा मलीन होत आहे. त्यामुळे ही बाब शोभणारी नाही, असेही जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी जिल्ह्यातील बँकांना दिलेल्या आदेशात म्हटले आहे.
शासन निर्देशानुसार पीक विमा व नैसर्गिक आपत्ती अंतर्गत शेतकºयांच्या खात्यात जमा केलेली रक्कम कपात करून शेतकºयांच्या कर्ज खात्यात जमा केल्यास संबंधित बँक अधिकाºयांना जबाबदार ठरवून, फौजदारी कारवाई करण्यात येणार आहे. यासंदर्भात जिल्ह्यातील सर्व बँक व्यवस्थापकांना मी आदेश दिला आहे.
-आस्तिककुमार पाण्डेय, जिल्हाधिकारी, अकोला