माझोड, भरतपूर परिसरातील शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:23 AM2021-07-07T04:23:34+5:302021-07-07T04:23:34+5:30
२७ जून रोजी वादळी वाऱ्यासह पाऊस पडला आणि आता पाऊस येईलच या भरवशावर तीस ते चाळीस टक्के शेतकऱ्यांनी पेरणी ...
२७ जून रोजी वादळी वाऱ्यासह पाऊस पडला आणि आता पाऊस येईलच या भरवशावर तीस ते चाळीस टक्के शेतकऱ्यांनी पेरणी केली. मात्र २८ जूनपासून पाऊस पडला नसल्यामुळे आणि उन्हाळ्यासारखे ऊन पडत असल्याने पिके करपली आहेत. अजून पावसाचे कुठल्याही प्रकारचे हवामान दिसत नाही. त्यामुळे पावसाअभावी शेतकरी दुबार पेरणीच्या संकटात सापडला आहे.
मोफत खते व बियाणे देण्याची मागणी
शेतकऱ्यांना मोफत खते व बियाणे उपलब्ध करून द्यावे. अशी मागणी भरतपूर येथील लालचंद घोगरे,भास्करराव खंडारे, प्रवीण घोगरे, राजेंद्र खंडारे, संजय घोगरे, नाना पाटील, राजू घोगरे, प्रशांत घोगरे, दयाराम वानखडे, गोवर्धन खंडारे, शत्रुघ्न खंडारे, प्रवीण खंडारे आदींनी केली आहे. तसेच माझोड येथील श्रावण वाघमारे, पांडुरंग बंड, मोहन तांबडे, दिनकरराव खंडारे, महादेव लहुडकार, रामकृष्ण नागे, दामोदर लहुडकार, शामराव बंड, रामा बोबडे, विजय बोचरे आदींसमवेत ग्रामस्थांनी केली आहे.