तिसऱ्या लाटेचे संकट; लहान मुलांचा तापही अंगावर काढू नका!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2021 04:20 AM2021-07-31T04:20:27+5:302021-07-31T04:20:27+5:30

ताप आला म्हणजे काेरोना असे नाही, पण... ताप येणे हे काेरोनाच्या संक्रमणातील प्रमुख लक्षण आहे, मात्र ताप आला म्हणजे ...

The crisis of the third wave; Don't even take the heat off of children! | तिसऱ्या लाटेचे संकट; लहान मुलांचा तापही अंगावर काढू नका!

तिसऱ्या लाटेचे संकट; लहान मुलांचा तापही अंगावर काढू नका!

Next

ताप आला म्हणजे काेरोना असे नाही, पण...

ताप येणे हे काेरोनाच्या संक्रमणातील प्रमुख लक्षण आहे, मात्र ताप आला म्हणजे कोरोना झालाच असे नाही.

त्यामुळे पालकांनी घाबरून न जाता बालरोग तज्ज्ञांच्या सल्ल्याने लहान मुलांवर औषधोपचारास सुरुवात करावी. जेणेकरून लहान मुलांना वेळेत उपचार मिळणे शक्य होईल.

कुठल्याही प्रकारचा ताप अंगावर न काढता डॉक्टरांच्या सल्ल्याने लहान मुलांची वेळीच कोविड चाचणी करावी.

सर्दी, खोकला, तापाची साथ

सद्यस्थितीत वातावरणातील बदलांमुळे लहान मुलांमध्ये सर्दी, ताप आणि खोकल्याची साथ सुरू आहे. त्यामुळे पालकांनी लहान मुलांची विशेष काळजी घेण्याची गरज आहे. त्यासाठी कुटुंबातील मोठ्या सदस्यांनी कोविड नियमांचे पालन करणेदेखील गरजेचे आहे.

बालकांसाठी कोविड केअर सेंटर

कोविडच्या संभाव्य तिसऱ्या लाटेची पूर्वतयारी म्हणून सुपर स्पेशालिटी रुग्णालयात विशेष सुविधा केली जात आहे. बालरुग्णांसाठी खाटांसह ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटर राखीव ठेवण्यात आले आहेत. या शिवाय खासगी रुग्णालयांमध्येही खाटा राखीव ठेवण्यात आले असून, आरोग्य विभागामार्फत तसे नियोजन करण्यात आल्याची माहिती आहे.

घाबरू नका, काळजी घ्या

सद्यस्थितीत जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात आहे, मात्र कोरोनाचे संकट पूर्णत: टळले नाही. त्यामुळे पालकांनी घाबरू न जाता लहान मुलांची काळजी घ्यावी. सर्दी, खोकला आणि ताप असल्याने बालरोगतज्ज्ञांच्या सल्ल्याने औषधोपचारास सुरुवात करावी. तसेच डॉक्टरांच्या सल्ल्यानेच कोविड चाचणी करावी.

- डॉ. विनीत वरठे, विभाग प्रमुख, बालरोग विभाग, जीएमसी, अकोला

Web Title: The crisis of the third wave; Don't even take the heat off of children!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.