निकष डावलून परजिल्ह्यातील उमेदवाराची निवड!

By admin | Published: June 16, 2016 02:11 AM2016-06-16T02:11:13+5:302016-06-16T02:11:13+5:30

वाशिक जिल्ह्यात संरक्षण अधिकारी पदभरती; पात्र उमेदवारास डावलल्याचा आरोप.

The criteria for the choice of candidate in the district! | निकष डावलून परजिल्ह्यातील उमेदवाराची निवड!

निकष डावलून परजिल्ह्यातील उमेदवाराची निवड!

Next

सुनील काकडे /वाशिम
जिल्हास्तरावरील संरक्षण अधिकारी (कनिष्ठ) या संवर्गातील पदभरतीसाठी मार्च २0१६ मध्ये झालेल्या परीक्षेत निकष डावलून जिल्ह्याबाहेरील उमेदवाराचा अंतिम निवड यादीत समावेश करण्यात आला. दरम्यान, याप्रकरणी रोहित यादवच्या आक्षेपांवरून रामदास गोविंदराव वानखेडे या उमेदवाराची नियुक्ती थांबविण्यात आली असून, प्रकरणाची वरिष्ठ पातळीवरून चौकशी सुरू आहे.
जुलै २0१५ मध्ये वाशिम जिल्ह्यात संरक्षण अधिकारी (कनिष्ठ) या पदाकरिता जाहिरात प्रसिद्ध झाली. त्यानुसार, २७ मार्च २0१६ रोजी २00 गुणांची परीक्षा घेण्यात आली तसेच ११ एप्रिल रोजी अंतिम निवड यादी व प्रतीक्षा यादी प्रसिद्ध झाली. संरक्षण अधिकारी (कनिष्ठ) या संवर्गातील पदे जिल्हास्तरावरील असल्याने जिल्ह्याबाहेरील उमेदवारास प्राधान्य देऊ नये, असे स्पष्टपणे नमूद असतानाही यवतमाळ जिल्ह्यातील टाकळी बु. (ता. दारव्हा) येथील रहिवासी रामदास गोविंदराव वानखेडे या उमेदवाराला नियुक्ती देऊन आपणास डावलण्यात आल्याचा आरोप रोहित यादवने केला आहे. यासंदर्भात रोहितने महिला व बाल विकास विभागाचे पुणे येथील आयुक्त, अमरावतीचे उपायुक्त, परीक्षा ह्यकन्डक्टह्ण करणार्‍या कुणाल आयटी सर्व्हिसेस प्रा.लि. आदींसोबतच शासनाकडे रीतसर तक्रार नोंदवून झालेला अन्याय दूर करण्याची मागणी केली; मात्र गेल्या तीन महिन्यांपासून त्यास कुठलाच न्याय मिळालेला नाही.
बोगस कागदपत्रे
रामदास गोविंदराव वानखेडे या उमेदवाराने बोगस कागदपत्रे सादर केल्याचे पुरावे रोहित यादवने गोळा केले आहेत. वानखेडेने ऑनलाइन अर्ज भरताना यवतमाळ जिल्ह्यातील टाकळी बु., ता. दारव्हा येथील रहिवासी असतानाही वाशिम शहरातील खोटा रहिवास पत्ता दर्शवून ४४४५0५ या पिनकोडऐवजी ४४४५0१ हा पिनकोड नमूद केला. अपंगत्वाच्या प्रमाणपत्रावर ४१ टक्के अपंगत्व असताना अर्जात मात्र ५0 टक्के अपंगत्व असल्याचे दाखविण्यात आले. याप्रकरणी तक्रार केल्यानंतर महिला व बालविकासच्या उपायुक्तांनी कुणाल आयटी प्रा.लि., पुणे यांच्याकडे अंगुलीनिर्देश करीत आपली जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न केला; तर परीक्षा ह्यकन्डक्टह्ण करणार्‍या संबंधित एजन्सीने वानखेडेचा अर्ज वाशिम जिल्ह्यातून प्राप्त झाल्यामुळेच त्याचा विचार करण्यात आल्याचे मोघम उत्तर देत हात झटकण्याचा प्रयत्न चालविला असून, पात्र असतानाही आपणांस सोयीस्कररीत्या डावलण्यात आल्याचा आरोप रोहित यादवने केला आहे.
दरम्यान, मार्च २0१६ मध्ये झालेल्या संरक्षण अधिकारी (कनिष्ठ) या पदभरतीप्रकरणी रोहित यादवच्या आक्षेपांची दखल घेण्यात आली असून, यासंदर्भात आयुक्त कार्यालयाकडे पत्रव्यवहार करण्यात आला आहे. सोबतच रामदास वानखेडे या उमेदवारास अद्याप नियुक्ती आदेश दिलेले नाहीत. वरिष्ठांच्या निर्देशानंतरच पुढील कार्यवाही केली जाणार असल्याची माहिती महिला व बाल विकास विभागाचे उपायुक्त एम.डी. बोरखडे यांनी लोकमतशी बोलताना दिली.

Web Title: The criteria for the choice of candidate in the district!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.