जिल्ह्यातील चार तालुक्यात ४,७७० हेक्टरवरील पिकांचे नुकसान !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2021 04:19 AM2021-03-23T04:19:53+5:302021-03-23T04:19:53+5:30

अकोला : अवकाळी पाऊस आणि गारपिटीच्या तडाख्यात गत चार दिवसात जिल्ह्यातील चार तालुक्यात ४ हजार ७७० हेक्टर ...

Crop damage on 4,770 hectares in four talukas of the district! | जिल्ह्यातील चार तालुक्यात ४,७७० हेक्टरवरील पिकांचे नुकसान !

जिल्ह्यातील चार तालुक्यात ४,७७० हेक्टरवरील पिकांचे नुकसान !

Next

अकोला : अवकाळी पाऊस आणि गारपिटीच्या तडाख्यात गत चार दिवसात जिल्ह्यातील चार तालुक्यात ४ हजार ७७० हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत सोमवारी विभागीय आयुक्तांकडे पाठविण्यात आला.

जिल्ह्यात विविध भागात १७,१८, १९ व २० मार्च रोजी या चार दिवसाच्या कालावधीत वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस आणि गारपीट झाली. अवकाळी पाऊस आणि गारपिटीच्या तडाख्यात कांदा,गहू, हरभरा, लिंबू, पपई, आंबा, भाजीपाला व इतर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. हाताशी आलेल्या पिकांचे नुकसान झाल्याने शेतकरी संकटात सापडला. या पार्श्वभूमीवर अवकाळी पाऊस व गारपिटीने नुकसानाचा प्राथमिक अहवाल सादर करण्याचा आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी जिल्ह्यातील तहसीलदारांना दिला होता. जिल्ह्यातील बार्शिटाकळी, मूर्तिजापूर, अकोट व पातूर या चार तालुक्यातील ३५ गावात ४ हजार ७७० हेक्टर ३४ आर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत सोमवारी अमरावती विभागीय आयुक्तांकडे पाठविण्यात आला.

चार तालुक्यात गावनिहाय असे आहे पिकांचे नुकसान !

तालुका गावे क्षेत्र (हेक्टर)

बार्शिटाकळी ०३ ११.८२

मूर्तिजापूर ०५ ११३.१०

अकोट १५ ४०५०.००

पातूर १२ ५९५.४२

..................................................................................

एकूण ३५ ४७७०.३४

पाचव्या दिवशीही जिल्ह्यात अवकाळी पाऊस !

जिल्ह्यात गत चार दिवसात जिल्ह्यातील अवकाळी पावसासह गारपिटीच्या तडाख्यात पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. पाचव्या दिवशीही सोमवारी पहाटे जिल्ह्यातील विविध भागात अवकाळी पाऊस बरसला. त्यामुळे पिकांचे नुकसान झाले आहे.

Web Title: Crop damage on 4,770 hectares in four talukas of the district!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.