जिल्ह्यातील पिकांची वाढ जोमदार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2017 02:42 AM2017-07-31T02:42:18+5:302017-07-31T02:42:23+5:30

अकोला : जुलै महिन्यात आलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील काही भागातील पिकांना जीवदान मिळाले असून, सोयाबीन, मूग, उडीद व भुईमूग पिकांची जोरदार वाढ झाली आहे.

Crop growth of crops in the district! | जिल्ह्यातील पिकांची वाढ जोमदार!

जिल्ह्यातील पिकांची वाढ जोमदार!

Next
ठळक मुद्दे२५ जुलैपर्यंत पेरणी: अल्प पावसाने काही भागाला तारले

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : जुलै महिन्यात आलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील काही भागातील पिकांना जीवदान मिळाले असून, सोयाबीन, मूग, उडीद व भुईमूग पिकांची जोरदार वाढ झाली आहे.
जिल्ह्यातील १० टक्के शेतकºयांनी जून महिन्यात पेरणी केली होती. त्यातील बहुतांश शेतकºयांना दुबार, तिबार पेरणी करावी लागली. क्वचित भागात पाण्याच्या सरी येऊन गेल्याने तेथील पिके तग धरू न होती. त्यानंतर जुलै महिन्याच्या सुरुवातीला दमदार पाऊस झाला. त्यानंतर पेरणीला वेग आला होता. तथापि, पुन्हा पावसाने दडी मारल्याने शेतकºयांनी पेरण्या थांबविल्या होत्या; पण अधून-मधून काही भागात तुरळक सरी कोसळल्या. त्या भागातील पिकांना दिलासा मिळाला होता. १५ जुलैनंतर पुन्हा पावसाला सुरुवात झाल्याने शेतकºयांनी पेरणीला सुरुवात केल.त्यानंतर १५ ते २७ जुलैपर्यंत पेरण्या सुरू होत्या. १५ जुलैनंतर तुरळक पाऊस सुरू असल्याने ही पिके अंकुरली आहेत. त्या अगोदरची पिके ज्यांना काही प्रमाणात पाणी मिळाले, ती पिके बहरली असून, त्या पिकांना दोन डवºयाचे फेरही देण्यात आले आहेत. जिल्ह्यात यावर्षी सोयाबीन पिकाचे क्षेत्र घटण्याचे संकेत होते; परंतु पाऊसच नसल्याने शेतकºयांनी सोयाबीन पेरणी केली आहे. त्या खालोखाल कापूस पीक असून, तूर, मूग, उडीद काही प्रमाणात आजही तग धरू न आहे; परंतु मूग, उडिदाला फुलोरा किती, याकडे शेतकºयांचे लक्ष लागले आहे. जुलै महिन्यातील पावसामुळे या पिकांची वाढ चांगली झाली आहे, तसेच खरीप भुईमूग पीकही काही भागात जोरात आले आहे. ज्वारीचा पेरा मात्र मर्यादित आहे. २५ जुलैनंतर पेरणी केलेली पिके अद्याप वर निघाली नाहीत.
दरम्यान, दोन दिवसांपासून पुन्हा पाऊस कमी झाला असून, तीन, चार ठिकाणी अत्यंत तुरळक पाऊस झाला. त्यामुळे शेतकºयांना दमदार पावसाची प्रतीक्षा आहे.

Web Title: Crop growth of crops in the district!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.