पीकविमा कंपन्या मालामाल; १३८ कोटी भरले; मिळणार ७८ कोटी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2021 04:20 AM2021-05-21T04:20:05+5:302021-05-21T04:20:05+5:30
--बॉक्स-- एकूण मंजूर पीक विमा ७७ कोटी ९० लाख प्रत्यक्ष शेतकऱ्यांनी भरलेले पैसे १८ कोटी ४८ लाख राज्य सरकारने ...
--बॉक्स--
एकूण मंजूर पीक विमा ७७ कोटी ९० लाख
प्रत्यक्ष शेतकऱ्यांनी भरलेले पैसे १८ कोटी ४८ लाख
राज्य सरकारने भरलेले पैसे ६० कोटी १० लाख
केंद्र सरकारने भरलेले पैसे ६० कोटी १० लाख
विमा काढणारे शेतकरी २ लाख ६३ हजार ९९३
लाभार्थी शेतकरी १ लाख ३ हजार ४३१
--पाईंटर--
खरीप हंगाम २०२०-२१
पीकविमा लागवड क्षेत्र २,१४,४५६
--बॉक्स--
मुगाला ४० तर कापूसला ४ कोटी मंजूर
जिल्ह्यात शेतकऱ्यांना पीकविम्याचा लाभ मिळणार आहे. यामध्ये मूग पिकासाठी ४० कोटी ६९ लाख २९ हजार ३०५ रुपये मंजूर झाले तर हरभरा, तूर साठी १९ कोटी ४७ लाख ८३ हजार ९२२ रुपये मंजूर झाले. कापूस पिकासाठी ४ कोटी ९ लाख ९६ हजार ५९९ तर सोयाबीनसाठी २ कोटी १९ लाख ४९ हजार ९५१ रुपये मंजूर झाले.
--बॉक्स--
१.६० लाख शेतकरी लाभ नाही!
जिल्ह्यामध्ये १८ कोटी ४८ लाख रुपये २ लाख ६३ हजार ९९३ शेतकऱ्यांनी विम्यापोटी भरले होते. यापैकी १ लाख ३ हजार ४३१ शेतकऱ्यांना पीकविम्याचा लाभ मिळणार आहे. शेतकऱ्यांना खात्यात रक्कम जमा करणे सुरू आहे; मात्र १ लाख ६० हजार ५६२ शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार नाही.
--कोट--
विमा भरूनही भरपाई नाही!
साडेआठ एकराचा पीकविमा काढलेला आहे. गेल्यावर्षी पिकांचे मोठे नुकसान झाले. लागवड खर्चही हाती लागला नाही. अद्यापपर्यंत पीकविमा मिळालेला नाही. मिळणार की नाही, हेही माहिती नाही.
- अनिल हरणे, शेतकरी, वणी रंभापूर
--कोट--
सोयाबीनचा आठ एकराचा पीकविमा काढला होता. खरीप हंगामात मोठे नुकसान झाले. सोयाबीन पीक खराब झाले. ९ एकरात केवळ २१ पोते सोयाबीन झाले. अद्याप पीकविम्याचे पैसे मिळाले नाही.
- योगेश गावंडे, शेतकरी, बोंदरखेड
--कोट--
तीन एकर शेती असून पीकविमा काढला आहे. पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. पुढे खरीप हंगाम असल्याने पीकविम्याचे पैसे मिळाल्यास आर्थिक अडचण दूर होईल.
- दिलीप काळे, सांगळूद