‘नेट कनेक्टिव्हिटी’अभावी अडकला ‘पीक विमा!’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 5, 2017 02:23 AM2017-08-05T02:23:02+5:302017-08-05T02:23:48+5:30
अकोला : प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत पीक विमा काढण्यासाठी ‘ऑनलाइन’ अर्ज भरण्याची मुदत ४ ऑगस्ट रोजी संपली; ‘सर्व्हर डाउन’ असल्याने ‘नेट कने िक्टव्हिटी’अभावी धावपळ करूनही जिल्हय़ातील अनेक शे तकर्यांना पीक विम्याचे ऑनलाइन अर्ज भरता आले नाही. त्यामुळे पावसाअभावी पिके धोक्यात आल्याच्या परिस्थितीत पीक विम्याचे ‘कवच’ही मिळणार की नाही, याबाबत शे तकर्यांसमोर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत पीक विमा काढण्यासाठी ‘ऑनलाइन’ अर्ज भरण्याची मुदत ४ ऑगस्ट रोजी संपली; ‘सर्व्हर डाउन’ असल्याने ‘नेट कने िक्टव्हिटी’अभावी धावपळ करूनही जिल्हय़ातील अनेक शे तकर्यांना पीक विम्याचे ऑनलाइन अर्ज भरता आले नाही. त्यामुळे पावसाअभावी पिके धोक्यात आल्याच्या परिस्थितीत पीक विम्याचे ‘कवच’ही मिळणार की नाही, याबाबत शे तकर्यांसमोर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत पीक विमा काढण्यासाठी शे तकर्यांचे ऑनलाइन अर्ज आणि विमा हप्त्याची रक्कम बँकांमध्ये जमा करण्याची मुदत गत ३१ जुलैपर्यंत होती. त्यानंतर गत १ ऑगस्ट रोजीच्या शासन निर्णयानुसार पीक विमा योजनें तर्गत विमा काढण्यासाठी ४ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आली.
त्यानुसार बिगर कर्जदार शेतकर्यांनी ४ ऑगस्टपर्यंत पीक विमा काढण्यासाठी जिल्हय़ातील सेतू केंद्र आणि कॉमन सर्व्हिस सेंटर (सीएससी)मार्फत ‘आपले सरकार’ या पोर्टलसह ‘अँग्री इन्श्युरन्स’ या वेबसाइटवर शेतकर्यांचे ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली; परंतु पीक विम्याचे ऑनलाइन अर्ज भरताना सर्व्हर डाउन होत असल्याने, तसेच नेट कनेक्टिव्हिटीअभावी पोर्टल आणि वेबसाइट वारंवार बंद पडत असल्याने, पीक विम्यासाठी शेतकर्यांचे ऑनलाइन अर्ज भरण्याचे काम कठीण झाले.
पीक विमा काढण्यासाठी ऑनलाइन अर्ज भरण्याकरिता शे तकर्यांना सेतू केंद्रांवर ताटकळत बसावे लागले. त्यामुळे पीक विमा काढण्यासाठी शासनामार्फत ४ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आली असली, तरी नेट कनेक्टिव्हिटीअभावी जिल्हय़ा तील अनेक शेतकर्यांना पीक विम्याचे ऑनलाइन अर्ज भरता आले नाही.
पावसाअभावी खरीप पिके धोक्यात असल्याच्या परिस्थितीत शे तकरी संकटात सापडला आहे. खरीप पिकांचे खरे नसल्याच्या स्थितीत शेतकर्यांसाठी पीक विम्याचा आधार ठरणार नाही; मात्र नेट कनेक्टिव्हिटीअभावी ऑनलाइन अर्ज भरणे शक्य झाले नसल्याने, पीक विम्याचे कवच मिळणार की नाही, असा प्रश्न शेतकर्यांसमोर निर्माण झाला आहे.
१५ ऑगस्टपर्यंत ऑफलाइन अर्ज स्वीकारा; आ. सावरकर यांचा औचित्याचा मुद्दा
पीक विमा योजनेंतर्गत ऑनलाइन अर्ज भरण्यात शेतकर्यांना होणार्या त्रासाबाबत आमदार रणधीर सावरकर यांनी शुक्रवारी विधानसभेत औचित्याचा मुद्दा उपस्थित करून शासनाचे लक्ष वेधले. पीक विमा योजनेंतर्गत ऑनलाइन अर्ज भरताना सर्व्हर डाउन असल्याने अर्ज भरताना शेतकर्यांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे पीक विमा काढणार्या शेतकर्यांचे ‘ऑफलाइन’ अर्ज स्वीकारण्यात यावे आणि शेतकर्यांना टोकन देऊन अर्ज स्वीकारण्यासाठी १५ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात यावी, अशी मागणीही रणधीर सावरकर यांनी सभागृहात व सभागृहाबाहेर मुख्यमंत्री व कृषी मंत्री यांच्याकडे केली.
टोल फ्री क्रमांकावर चार दिवसांत ५0 शेतकर्यांच्या तक्रारी!
पीक विमा काढण्यासाठी सर्व्हर डाउन असल्याने तसेच नेट कनेक्टिव्हिटीअभावी पोर्टल वारंवार बंद पडत असल्याने, ऑनलाइन अर्ज भरण्यात अडचणी निर्माण होत आहेत. अर्ज भरणे कठीण झाले आहे. यासंदर्भात १ ते ४ ऑगस्टदरम्यान जिल्हय़ातील ५0 शेतकर्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियंत्रण कक्षाच्या १0७७ या टोल फ्री क्रमांकावर तक्रारी केल्या आहेत.