पीक विम्याचे पोर्टल झाले हँग; लाखो शेतकरी राहणार वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2019 01:39 PM2019-07-24T13:39:49+5:302019-07-24T13:39:58+5:30

पीक विमा काढण्याच्या शेवटच्या तारखेपर्यंतही पीक विमा तांत्रिक अडचणींमध्ये अडकलेला आहे. त्यामुळे लाखो शेतकरी सरकारच्या योजनांपासून वंचित राहणार असल्याचे संकेत मिळत आहे.

Crop insurance portal hang; Millions of farmer will deprived | पीक विम्याचे पोर्टल झाले हँग; लाखो शेतकरी राहणार वंचित

पीक विम्याचे पोर्टल झाले हँग; लाखो शेतकरी राहणार वंचित

Next

- संजय खांडेकर

अकोला: पीक विम्याचे पोर्टल सातत्याने हँग होत असल्याने शेतकरीपीक विमा काढण्यासाठी सायबर कॅफेंचे उंबरठे झिजवित आहेत. पीक विमा काढण्याच्या शेवटच्या तारखेपर्यंतही पीक विमा तांत्रिक अडचणींमध्ये अडकलेला आहे. त्यामुळे लाखो शेतकरी सरकारच्या योजनांपासून वंचित राहणार असल्याचे संकेत मिळत आहे.
जुलै महिना संपत आला असला तरी, पश्चिम विदर्भात अद्याप पावसाचा पत्ता नाही. सुरुवातीला पावसाने काही प्रमाणात हजेरी लावली त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणी केली; मात्र त्यानंतर पावसाने दडी मारली ती कायम आहे. त्यामुळे पश्चिम विदर्भवासीयांचे पीक संकटात आहे. पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत अर्ज करण्याची प्रक्रिया आॅनलाइन झाल्याने शेतकºयांना सातबारा, नमुना आठ, स्वयं घोषित पेरेपत्रक, बँकेच्या पासबुकची झेरॉक्स स्कॅन करून आॅनलाइन विमा काढावा लागतो. ही संपूर्ण प्रक्रिया आॅनलाइन असल्याने इंटरनेटच्या नेटवर्कवर अवलंबून आहे. पीक विमा काढण्यासाठी जात असलेल्या शेतकºयांना तासन्तास सायबर कॅफेत बसण्याची वेळ येत आहे. पीक विमा पोर्टलची क्षमता वाढविणे गरजेचे असतानादेखील सरकारच्या वतीने त्यावर ठोस उपाय शोधले गेलेले नाही. मंगळवार २३ जुलै रोजी अकोल्यासह तालुकाच्या ठिकाणी असलेल्या सर्व सायबर कॅ फेंचे चित्र सारखेच होते. त्यामुळे शेतकरी आणि सायबर कॅफेचे संचालक दोघेही त्रासलेत. दररोज साडेचारनंतर पोर्टलची स्पीड कमी होत असल्याची समस्या कायम आहे. बुधवार २४ जुलै रोजी पीक विमा काढण्याची शेवटची तारीख आहे; मात्र पोर्टल सातत्याने हँग होत असल्याने लाखो शेतकºयांना पीक विमा संरक्षण योजनेपासून वंचित राहण्याची पाळी येणार आहे. त्यामुळे पीक विमा काढण्याची तारीख वाढविण्याची गरज आहे.


 पीक विमा दरात दुपटीने वाढ

पीक विमा काढणाºयांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्या तुलनेत विमा मिळालेल्या शेतकºयांची संख्या मात्र बोटावर मोजण्याऐवढी आहे. दरम्यान, पीक विमा काढणाºया कंपन्यांनी विमा दरात मागील वर्षाच्या तुलनेत यंदा दुपटीने वाढ केली आहे. त्यामुळे शेतकºयांना दुहेरी आर्थिक फटका सोसावा लागत आहे.

 

 गत चार दिवसांपासून आॅनलाइन पीक विमा काढण्यासाठी सायबर कॅफेच्या चकरा मारीत होतो. आज ३ तास सायबर कॅफेत बसावे लागते. दोन-तीनदा यादरम्यान पोर्टल हँग झाले. दोनदा वीज पुरवठा खंडित झाला.
- पुंडलिक दामोदर, शेतकरी, (टाकळी- बाळापूर)

 

Web Title: Crop insurance portal hang; Millions of farmer will deprived

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.