अकोला जिल्ह्यात केवळ ४१ हजार शेतकऱ्यांना पीक कर्ज!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 5, 2019 02:00 PM2019-08-05T14:00:04+5:302019-08-05T14:00:10+5:30
जिल्ह्यात २ आॅगस्टपर्यंत केवळ ४१ हजार ७४९ शेतकºयांना ३७३ कोटी २५ लाख रुपयांचे पीक कर्ज वाटप करण्यात आले.
- संतोष येलकर
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : यावर्षीच्या खरीप हंगामासाठी जिल्ह्यात १ लाख ७४ हजार ८४७ शेतकऱ्यांना १ हजार ३९८ कोटी ७८ लाख रुपये पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट असले तरी, जिल्ह्यात २ आॅगस्टपर्यंत केवळ ४१ हजार ७४९ शेतकºयांना ३७३ कोटी २५ लाख रुपयांचे पीक कर्ज वाटप करण्यात आले. खरीप पेरण्या आटोपल्या असल्या तरी, जिल्ह्यातील उर्वरित १ लाख ३३ हजार शेतकरी पीक कर्जाच्या प्रतीक्षेत आहेत. त्यामुळे पीक कर्ज वाटप पूर्ण होणार तरी केव्हा, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
खरीप पेरणीसाठी शेतकºयांना बियाणे, खते, कीटकनाशके व इतर खर्च भागविण्यासाठी पीक कर्ज उपलब्ध व्हावे, यासाठी यावर्षीच्या खरीप हंगामासाठी जिल्ह्यातील १ लाख ७४ हजार ८४७ शेतकºयांना १ हजार ३९८ कोटी ७८ लाख रुपये पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट ठरविण्यात आले. त्यानुषंगाने गत १ एप्रिलपासून जिल्ह्यात बँकांमार्फत शेतकºयांना खरीप पीक कर्ज वाटप करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली; परंतु जिल्ह्यातील खरीप पेरण्या आटोपल्या असल्या तरी, उद्दिष्टाच्या तुलनेत २ आॅगस्टपर्यंत जिल्ह्यात केवळ ४१ हजार ७४९ शेतकºयांना ३७३ कोटी २५ लाख रुपये (२७ टक्के) पीक कर्जाचे वाटप करण्यात आले. उर्वरित १ लाख ३३ हजार ९८ शेतकºयांना अद्यापही पीक कर्जाचा लाभ मिळाला नाही. त्यामुळे पीक कर्जाच्या लाभापासून वंचित असलेल्या जिल्ह्यातील शेतकºयांना खरीप पीक कर्जाचा लाभ केव्हा मिळणार आणि जिल्ह्यातील पीक वाटपाचे उद्दिष्ट पूर्ण होणार तरी केव्हा, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.