पातूर तालुक्यातील ३१ हजार ५३६ हेक्टरवरील पिके धोक्यात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2021 04:19 AM2021-07-29T04:19:47+5:302021-07-29T04:19:47+5:30

संतोषकुमार गवई पातूर : तालुक्यात खरीप हंगामातील पिके बहरलेली असताना, गुरुवार, दि. २२ जुलै रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे तालुक्यातील ३१८० ...

Crops on 31 thousand 536 hectares in Pathur taluka in danger! | पातूर तालुक्यातील ३१ हजार ५३६ हेक्टरवरील पिके धोक्यात!

पातूर तालुक्यातील ३१ हजार ५३६ हेक्टरवरील पिके धोक्यात!

googlenewsNext

संतोषकुमार गवई

पातूर : तालुक्यात खरीप हंगामातील पिके बहरलेली असताना, गुरुवार, दि. २२ जुलै रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे तालुक्यातील ३१८० हेक्टर क्षेत्र बाधित झाले असून, ३१ हजार ५३६ हेक्टर क्षेत्रावरील पिके धोक्यात आल्याचा अंदाज आहे. खरीप हंगामाच्या प्रारंभी पावसाने दडी मारल्याने दुबार पेरणी, तर आता पिके बहरलेली असताना अतिवृष्टीमुळे झालेले नुकसान, यामुळे शेतकरी हतबल बनला असून, शेतकऱ्यांना तत्काळ मदत देण्याची मागणी होत आहे.

पातूर तालुक्यात गत आठवड्यातील अतिवृष्टीमुळे शेतात पाणी साचून पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यासंदर्भात तालुक्यातील ५,७९० शेतकऱ्यांनी ३१८० हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. संततधार पावसाने अनेक ठिकाणी पुराचे पाणी शेतात साचल्याने पिके पिवळी पडली, तर काही पिके सडली आहेत. शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. जून ते जुलैच्या सहा आठवड्यांच्या कालावधीत पावसाअभावी पिकांची उत्पादन क्षमता घटली होती. आधी पावसाअभावी आणि आता पावसामुळे शेती पिकांची अवस्था दयनीय बनलेली आहे. अनेक भागातील शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागली होती. सद्यस्थितीत पिके बहरलेली असताना अतिवृष्टीमुळे शेतीचे कमालीचे नुकसान झाले आहे. त्यामुळे शासनाकडून शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यात यावी, अशी मागणी जोर धरत आहे.

(फोटो)

-----------------

तालुक्यातील पाचही महसूल मंडलात अतिवृष्टी

बदलत्या वातावरणाचा सार्वाधिक फटका हा शेतकऱ्यांना सोसावा लागत आहे. तालुक्यातील पाचही महसुली मंडलात दि. २२ जुलै रोजी अतिवृष्टी झाली आहे. पातूर मंडलात ८० मि.मी., बाभूळगाव मंडल ६५ मि.मी., चान्नी मंडल ६५.३० मि.मी., आलेगाव मंडल ७२ मि.मी., तर सस्ती मंडलात ६६.८० मि.मी., अशी एकूण तालुक्यात ६९.७० मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.

Web Title: Crops on 31 thousand 536 hectares in Pathur taluka in danger!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.