पिके खल्लास; शेतकरी खचला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2019 12:38 PM2019-10-30T12:38:59+5:302019-10-30T12:43:17+5:30

२० आॅक्टोबरपासून जिल्ह्यात सतत पाऊस सुरू असल्याने, खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. 

Crops damaged, due to heavy rain in Akola | पिके खल्लास; शेतकरी खचला!

पिके खल्लास; शेतकरी खचला!

Next
ठळक मुद्देभिजलेला कापूस आणि कपाशीच्या सडलेल्या बोंड्या गळून मातीत मिसळल्या आहेत.हाता-तोंडाशी आलेला घास परतीच्या पावसाने पळविला.ज्वारी काळीभोर झाली असून, कापणी झालेल्या ज्वारीला कोंब फुटले आहेत.

- संतोष येलकर  
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : परतीच्या पावसाने जिल्ह्यात पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे.  कापणीला आलेली ज्वारी काळीभोर पडली असून, कापणी झालेल्या ज्वारीला कोंब फुटले आहेत. सोयाबीन सडले असून, भिजलेला कापूस आणि सडलेल्या बोंड्या मातीत मिसळल्या आहेत. खरीप पिके खल्लास झाल्याच्या स्थितीत हाता-तोंडाशी आलेला घास पावसाच्या दुष्टचक्राने पळविल्याने, शेतकरी पार खचल्याचे वास्तव बारुला विभागातील गाव-शिवारांमध्ये समोर आले आहे.
पावसाळा संपला असला तरी; परतीचा पाऊस बरसणे सुरूच आहे. गत २० आॅक्टोबरपासून जिल्ह्यात सतत पाऊस सुरू असल्याने, खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. 
शेतात कापणीला आलेली ज्वारी काळीभोर झाली असून, कापणी झालेल्या ज्वारीला कोंब फुटले आहेत, तसेच पावसाचे पाणी साचलेल्या शेतांमध्ये कापणीला आलेले सोयाबीन सडले असून, कापणीनंतर भिजलेल्या सोयाबीनला कोंब फुटले आहेत. परतीच्या पावसाने वेचणीला आलेला कापूस भिजला असून, भिजलेला कापूस आणि कपाशीच्या सडलेल्या बोंड्या गळून मातीत मिसळल्या आहेत. यंदाच्या खरीप हंगामात मूग व उडदाचे उत्पादन बुडाल्यानंतर कापणीला आलेल्या ज्वारी, सोयाबीन व कापूस पिकाचे प्रचंड नुकसान झाले आहे. हाता-तोंडाशी आलेला घास परतीच्या पावसाने पळविला असून,  पीक उत्पादनाचे स्वप्न भंगल्याने, शेतकºयांचा धीर खचल्याचे वास्तव अकोला तालुक्यातील बारुला विभागात सांगळूद, धोतर्डी, आपातापा, खोबरखेड, घुसर व खरप बु. इत्यादी गावांच्या शिवारात  समोर आले आहे.

 एकरातील सोयाबीन सडले; उत्पादन बुडाले !
सतत सुरू असलेल्या परतीच्या पावसाने खरप बु. शिवारात शेतकरी संतोष चिंचोलकार यांच्या १७ एकर शेतातील कापणीला आलेले सोयाबीन सडले आहे. पाण्याखाली असलेल्या सोयाबीनच्या शेंगांमधील दाणे सडले आहेत. पेरणीसह पीक लागवडीसाठी दोन लाख रुपयांचा खर्च केला; मात्र परतीच्या पावसामुळे सोयाबीन सडल्याने, पिकाचे उत्पादन बुडाले आहे.
४त्यामुळे सरकारने पीक नुकसान भरपाईची मदत दिली पाहिजे, अशी मागणी शेतकरी संतोष चिंचोलकार यांनी केली आहे.

 

 

Web Title: Crops damaged, due to heavy rain in Akola

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.