उष्णतेच्या लाटेने पिके होरपळली!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2020 12:02 PM2020-05-27T12:02:29+5:302020-05-27T12:02:40+5:30
संत्रा, मोसंबी, केळी, आंबा व इतर पिकांवर दुष्परिणाम दिसून येत आहे
अकोला : विदर्भात तापमानाचा पारा ४७ अंशाच्या वर गेल्याने याचे परिणाम भाजीपाला पिकावर दिसून येत असून, ही पिके सुकू लागली आहेत.
यावर्षी मे महिना उघडताच तापमानात वाढ होत असून, गत दोन-तीन दिवसांपासून पारा अचानक वाढला आहे. अकोल्याचे तापमान ४७.४ अंशांवर पोहोचले आहे. त्यामुळे अकोला जिल्हा होरपळला असून, घराबाहेर निघणे कठीण झाले आहे. तापमानामुळे बाष्पीभवन वाढत असून, पाणी दिले तरी जमिनीतील ओलावा कमी होत आहे. अनेक भागात पाण्याची पातळी खोल गेली आहे. बाष्पीभवन होत असलेल्याने फळे, भाजीपाला पिके होरपळली आहेत. यामध्ये मुख्यत्वे संत्रा, मोसंबी, केळी, आंबा व इतर पिकांवर दुष्परिणाम दिसून येत आहे. अनेक भागात पाण्याची पातळी खोल गेल्याने आणि अशातच तापमान वाढल्याने पिकांच्या वाढीवर परिणाम झाला आहे.
अकोला जिल्ह्यात संत्रा, लिंबू या या फळपिकाच्या भाजीपाला व इतरही उन्हाळी पिके घेतली जातात. सध्या संत्र्याचा आंबिया बहार आहे. तापमानामुळे या पिकाला फटका बसत आहे. येत्या काही दिवस ही उष्णतेची लाट राहण्याची शक्यता असल्याने या पिकाची काळजी घ्यावी लागणार आहे. पिकांना संरक्षित ओलित करावे लागणार आहे. जिल्ह्यात कांदा पीकही घेतले जाते, अलीकडे केळी पिकाचे क्षेत्र वाढले आहे. ज्यांच्याकडे अल्प पाण्याची सोय आहे, ते शेतकरी उन्हाळी पिकांची पेरणी करतात; परंतु मागील वर्षापासून शेतकºयांवर संकट कोसळले असून, मागच्या वर्षी पावसाने झोडपले म्हणून ठिकाणचा उतारा कमी आला. आता उन्हाळी पीक लावले. फळपिके, भाजीपाला आला; परंतु उन्हाचा कहर सुरू झाला. मागील शंभर वर्षात प्रथमच ४७४ डिग्री तापमान वाढल्याने एकसुद्धा घरात येते की नाही, याची चिंता शेतकऱ्यांमध्ये वाढली आहे.