दमदार पावसामुळे पिके जोमात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2021 04:15 AM2021-07-15T04:15:02+5:302021-07-15T04:15:02+5:30

उडीद, मुगाचा पेरा वाढला! पावसाने पाठ फिरविल्याने पेरलेले उडीद, मूग करपण्याच्या मार्गावर होते. पेरणी पूर्ण होणार की नाही, असा ...

Crops thrive due to heavy rains! | दमदार पावसामुळे पिके जोमात!

दमदार पावसामुळे पिके जोमात!

Next

उडीद, मुगाचा पेरा वाढला!

पावसाने पाठ फिरविल्याने पेरलेले उडीद, मूग करपण्याच्या मार्गावर होते. पेरणी पूर्ण होणार की नाही, असा शंकाही व्यक्त केली जात होती; परंतु गत आठ दिवसांमध्ये झालेल्या पावसामुळे उडीद, मुगाचा पेरा वाढला आहे. जिल्ह्यात उडीद ७७ टक्के तर मुगाची ८४ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे.

सरासरी क्षेत्र

४,८३,२९१ हेक्टर

पेरणी झालेले क्षेत्र

३,९५,८७१ हेक्टर

रात्रभर सर्वदूर पाऊस

जिल्ह्यात काही दिवसांपासून दररोज पाऊस बरसत आहे. मंगळवारी रात्री सर्वदूर पावसाने हजेरी लावली. बुधवारी सकाळपर्यंत जिल्ह्यात २४.३ मिमी पावसाची नोंद झाली. जिल्ह्यात या मान्सूनमध्ये २०२.२ मिमी पाऊस झाला.

या खरीप हंगामात सोयाबीन पिकाची १३ जूनला टोकन पद्धतीने लागवड केली. याकरिता एकरी १३ किलो बियाणे लागले असून १७ किलो बियाण्यांची बचत झाली. सध्याच्या परिस्थितीमध्ये पीक जोमात आहे.

- मनोहर शेगोकार, शेतकरी, सोनाळा

Web Title: Crops thrive due to heavy rains!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.