तेल्हारा तालुक्यात पिके पाण्याखाली; ६६४.५० मिमी पावसाची नोंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2021 04:24 AM2021-09-09T04:24:19+5:302021-09-09T04:24:19+5:30

पावसाची रिपरिप सुरू असल्याने अनेक सखल भागातील शेतात पाणी साचले असून, पिके पाण्याखाली आहेत. त्यामुळे कपाशी, सोयाबीन, मूग, उडीद, ...

Crops under water in Telhara taluka; Record rainfall of 664.50 mm | तेल्हारा तालुक्यात पिके पाण्याखाली; ६६४.५० मिमी पावसाची नोंद

तेल्हारा तालुक्यात पिके पाण्याखाली; ६६४.५० मिमी पावसाची नोंद

Next

पावसाची रिपरिप सुरू असल्याने अनेक सखल भागातील शेतात पाणी साचले असून, पिके पाण्याखाली आहेत. त्यामुळे कपाशी, सोयाबीन, मूग, उडीद, तूर, ज्वारी यासारख्या पिकांना फटका बसण्याची शक्यता शेतकऱ्यांनी वर्तविली आहे. तसेच रोगराई व पिके पिवळी पडून उत्पादनामध्ये घट होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

पूर्णा नदीला पूर असल्याने विद्रुपा नदीचे पाणी पूर्णा नदीत जात नसून, उलट पूर्णा नदीचे पाणी विद्रुपा नदीत येत असल्याने विद्रुपा नदीने रौद्ररूप धारण केल्याचे दिसून येत आहे. नदीकाठच्या शेतात पाणी शिरल्याने प्रचंड नुकसान झाले आहे.

------------

या गावांमध्ये पिकांचे नुकसान

तालुक्यातील वांगरगाव, बाभूळगाव, तळेगाव पातूर्डा, तळेगाव वडनेर, तळेगाव डवला, मनात्री या गावांमध्ये पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच तेल्हारा-अकोला-निंबा मार्गावरील वाहतूक पूर्णा नदीला पूर असल्याने बंद होती. काहींनी खिरोडा-शेगावमार्गे जाण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे या मार्गाने वाहतूक दिसून आली.

-----------------

आतापर्यंत तालुक्यात ९८.५० टक्के पाऊस पडला असून, आतापर्यंत ६६४.५० मिमी पाऊस पडला. गेल्यावर्षीच्या तुलनेत आजपर्यंत १७१ मिमी पाऊस जास्त झाला आहे.

-डॉ. संतोष येवलीकरक, तहसीलदार

Web Title: Crops under water in Telhara taluka; Record rainfall of 664.50 mm

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.