शेगावात भाविकांची गर्दी !
By Admin | Published: July 13, 2015 01:16 AM2015-07-13T01:16:54+5:302015-07-13T01:16:54+5:30
दोन लाखावर भाविकांची उपस्थिती, आठ हजारावर वाहने.
फहीम देशमुख / शेगाव (जि. बुलडाणा) : महाराष्ट्राचे श्रध्दास्थान संतश्रेष्ठ श्री गजानन महाराजांच्या दर्शनासाठी अधिक मास आणि एकादशीचा योग साधून रविवारी राज्यातून जवळपास दोन लाख भाविकांनी हजेरी लावली. दुसरा शनिवार व रविवार, एकादशी आणि अधिक मास हा योग आल्यामुळे भाविक भक्तांनी शेगाव येथे श्रींचे दर्शन घेतले. सकाळपासूनच सर्व रस्त्यांवर वाहनांची वर्दळ वाढली होती. एस.टी. बसस्थानक व रेल्वे स्टेशनवरही तोबा गर्दी होती. स्थानिक वाहतूक पोलिस व रेल्वे पोलिस बंदोबस्तासाठी सतर्क झाले आहेत. श्रींचे दर्शन घेतल्यानंतर भाविकांनी आनंद सागरवर दिवस घालवला. भाविक आणि पर्यटकांचे आकर्षण ठरलेल्या आनंद सागरमध्ये दिवसभर प्रचंड गर्दी होती.
*आठ हजारावर वाहने
संत गजानन महाराजांचे दर्शन घेण्यासाठी जवळपास दोन लाख भाविक आणि आठ हजारावर वाहने दाखल झाली. यामुळे पोलिस प्रशासनाची दमछाक झाली.