जमाव बंदीला खाे; मास्क सक्तीसाठी माेहीम कडक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2021 04:32 AM2021-02-18T04:32:48+5:302021-02-18T04:32:48+5:30
अकोला : जिल्ह्यात गेल्या पंधरा दिवसांपासून कोरोना विषाणू संसर्गाचा वाढता कहर लक्षात घेता, कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना ...
अकोला : जिल्ह्यात गेल्या पंधरा दिवसांपासून कोरोना विषाणू संसर्गाचा वाढता कहर लक्षात घेता, कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून जिल्ह्यात १५ फेब्रुवारी रोजी मध्यरात्रीपासून जमाव बंदी लागू करण्याचा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिला; मात्र १६ फेब्रुवारी राेजी पहिल्याच दिवशी जमाव बंदीला अकाेलेकरांनी धाब्यावर बसविल्याचे चित्र हाेते ते बुधवारीही कायम राहिले प्रशासनाने केवळ मास्क न वापरण्याऱ्यांविराेधात कारवाईचा बडगा उचल्याचे दिसून आले दुसरीकडे महापालिकेने मास्क नसल्यास नागरिकांकडून दंड आकारण्यासाठी विशेष पथकांचे गठण केले आहे. अकाेला शहरात सार्वजनिक ठिकाणी होणारी नागरिकांची गर्दी कायम असून, ‘फिजिकल डिस्टन्सिंग’ आणि मास्कचा वापर होत नसल्याचे वास्तव समोर आले. शहरातील जनता भाजीबाजार, मध्यवर्ती बसस्थानक, टाॅवररोड, जिल्हाधिकारी कार्यालय परिसर आदी भागांत रस्त्यावर आणि सार्वजनिक ठिकणी नागरिकांची गर्दी कायम असून, जमाव बंदी आदेशाची अंमलबजावणी आणि करोना संसर्ग संसर्ग नियंत्रित करण्यासाठी नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्याच्या कामाकडेही संबंधित यंत्रणांकडून कानाडोळा करण्यात येत असल्याचे स्पष्ट झाले.