अकोटात लसीकरण केंद्रावर गर्दी उसळली!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2021 04:18 AM2021-05-13T04:18:28+5:302021-05-13T04:18:28+5:30
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कडक लॉकडाऊन केले. जनता घरात बसून आहेत. बाजारपेठ ठप्प झाली आहे. कारवाईचा धडका सुरू आहे. ...
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कडक लॉकडाऊन केले. जनता घरात बसून आहेत. बाजारपेठ ठप्प झाली आहे. कारवाईचा धडका सुरू आहे. त्यामुळे आर्थिक झळ पोहोचत आहे. परंतु दुसरीकडे कडक संचारबंदी असतानाही अकोट ग्रामीण रुग्णालय, गोलबाजार रुग्णालयात लसीकरणासाठी मोठी गर्दी उसळत आहे. लसीकरण केंद्रांवर रांगाच्या रांगा लागत आहेत. त्यामुळे कोरोना नियम पायदळी तुडविले जात आहेत. फिजिकल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला आहे. केंद्रांवर लागणाऱ्या नागरिकांच्या रांगा, कोरोनाचे संक्रमण वाढविण्यास कारणीभूत ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही. लसीकरणकरीता नोंदणी केलेल्या लोकांना वेळ ठरवुन मॅसेजव्दारे टप्पाटप्प्याने बोलावण्याची गरज आहे.
फोटो: मेल फोटोत
नियोजन नसल्याने लसीकरण केंद्रांवर गर्दी
नियोजनाचा अभाव असल्याने होणारी गर्दी कोरोनाला निमंत्रण देत असल्याचे दिसत आहे. या ठिकाणी नागरिकांना टोकन देण्यात आले. परंतु लस मिळणार की नाही. यामुळे गर्दी कमी होत नाही. शिवाय नोंदणी करणाऱ्यास वेळ लागत असल्यामुळे गर्दीत भर पडत होती.
सेतू केंद्र संचालक देणार सेवा
लसीकरणासाठी नोंदणी पडताळणी व गर्दी टाळण्याकरिता तहसीलदार नीलेश मडके यांनी तात्काळ नियोजन केले. त्यानुसार आता १३ मे पासुन शहर व ग्रामीण भागातील लसीकरण केंद्रावर सेतू केंद्र संचालक हे संगणक संच, लॅपटॉपपसह सेवा देणार आहेत. तसेच शासकीय कर्मचारी यांची लसीकरण केंद्रावर नोंदणीकरिता नियुक्ती केली आहे.