नोंदणी, मुद्रांक विभागासमोर गर्दी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2021 04:28 AM2021-02-23T04:28:45+5:302021-02-23T04:28:45+5:30
अकोला: कोरोना विषाणूचा संसर्ग नियंत्रित करण्यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत विविध उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यात येत असताना जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातीलच नोंदणी व ...
अकोला: कोरोना विषाणूचा संसर्ग नियंत्रित करण्यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत विविध उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यात येत असताना जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातीलच नोंदणी व मुद्रांक विभागासमोर नागरिकांची गर्दी होत असल्याने '' फिजिकल डिस्टन्सिंग'' चा फज्जा उडत असल्याचे वास्तव सोमवारी समोर आले.
जिल्ह्यात गेल्या २० दिवसांपासून कोरोना विषाणूचा संसर्ग वाढत असून रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. त्यानुषंगाने कोरोना विषाणूचा संसर्ग नियंत्रित करण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून जिल्हा प्रशासनामार्फत विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. त्यामध्ये फिजिकल डिस्टन्सिंग व मास्कचा वापर इत्यादी नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध दंडात्मक कारवाईही केली जात आहे. परंतु, जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील नोंदणी व मुद्रांक विभागासमोर नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असून फिजिकल डिस्टन्सिंगचे उल्लंघन होत असल्याचे चित्र सोमवारी दिसून आले.