एसटी बसवर प्रवाशांची गर्दी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2021 04:18 AM2021-04-22T04:18:57+5:302021-04-22T04:18:57+5:30
शासनाने १५ एप्रिलपासून कोरोना महामारीवर नियंत्रण मिळविण्याकरीता ब्रेक द चेन अंतर्गत कडक निर्बंध लागू केले. अत्यावश्यक सेवा व्यतिरिक्त इतर ...
शासनाने १५ एप्रिलपासून कोरोना महामारीवर नियंत्रण मिळविण्याकरीता ब्रेक द चेन अंतर्गत कडक निर्बंध लागू केले. अत्यावश्यक सेवा व्यतिरिक्त इतर दुकाने बंद ठेवण्याचे आदेश प्रशासनाने दिले असतानाही नागरिक गंभीर दिसत नसून किरकोळ कामांसाठी घराबाहेर पडून गर्दी करीत आहेत. या गर्दीला थांबविण्याकरिता प्रशासनाने आता अत्यावश्यक सेवांवरही वेळेची बंधने घातली. ठाणेदार अनंत वडतकार, पीएसआय योगेश जाधव, राजेंद्र मोरे दुकाने बंद करीत असल्याचे चित्र दिसत आहे. एसटी बस सेवा सुरळीत सुरू असल्यामुळे फिरणारे नागरिक एसटी बसवर गर्दी करीत आहेत. तेल्हारा आगाराच्या एम.एच.४० वाय. ५७१३ बसगाडीवर ५० ते ६० प्रवाशांनी चढण्याकरीता एकच गर्दी केली. महिला वाहक प्रवाशांना गाडीत जागा नसल्याबाबत विनंती करीत होत्या. परंतु प्रवाशांनी त्याकडे दुर्लक्ष केले. प्रवाशांनी महिला वाहकासोबत बाचाबाची करून बसगाडीत प्रवेश मिळविला.
फोटो: ईएमएसवर