जीएमसीतील नॉनकोविड ओपीडीत रुग्णांची गर्दी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2021 04:14 AM2021-07-18T04:14:25+5:302021-07-18T04:14:25+5:30
अशी आहे जीएमसीची स्थिती वॉर्डांची स्थिती कोविड काळात ...
अशी आहे जीएमसीची स्थिती
वॉर्डांची स्थिती कोविड काळात - सद्य:स्थितीत
नॉनकोविड वॉर्ड - ०९ - १६
दाखल रुग्ण - १५० - ५००
ओपीडी (दररोज) - ४० - १०००
कोविड खाटा - ४५० - २०४
रखडलेल्या शस्त्रक्रिया पुन्हा सुरू
कोविड काळात अनेकांच्या शस्त्रक्रिया रखडल्या होत्या. मात्र, आता नॉनकोविड वॉर्ड पुन्हा सुरू झाले असून, शस्त्रक्रिया विभागही पूर्ण क्षमतेने सुरू झाला आहे. त्यामुळे हर्निया, नेत्र शस्त्रक्रियेसोबतच इतरही लहानमोठ्या शस्त्रक्रिया सुरू झाल्या आहेत. त्यामुळे अनेक रुग्णांना मोठा दिलासा मिळाला आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने नॉनकाेविड वॉर्ड पूर्ण क्षमतेने सुरू करण्यात आले आहेत. ओपीडीमध्ये रुग्ण तपासणीचे प्रमाणही वाढले आहे. असे असले तरी कोरोनाचा संभाव्य धोका लक्षात घेता सर्वोपचार रुग्णालयातील ४५० खाटा कोविड रुग्णांसाठी तातडीने सुरू करता येतील, अशी व्यवस्था करण्यात आली आहे.
- डॉ. श्यामकुमार सिरसाम, वैद्यकीय अधीक्षक, जीएमसी, अकाेला