पेट्रोल पंपावर गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2021 04:12 AM2021-03-29T04:12:15+5:302021-03-29T04:12:15+5:30
---------------------------- -जि.प. बांधकाम विभागाच्या आढावा! अकोला : जिल्हा परिषद बांधकाम विभागांतर्गत जिल्ह्यातील विविध विकासकामांचा आढावा रविवारी आयोजित बैठकीत ...
----------------------------
-जि.प. बांधकाम विभागाच्या आढावा!
अकोला : जिल्हा परिषद बांधकाम विभागांतर्गत जिल्ह्यातील विविध विकासकामांचा आढावा रविवारी आयोजित बैठकीत घेण्यात आला जिल्हा परिषद उपाध्यक्ष तथा बांधकाम सभापती सावित्री राठोड यांनी बांधकाम विभागाच्या कामांचा आढावा घेतल असून, या बैठकीला सत्तापक्ष गटनेता ज्ञानेश्वर सुलताने यांच्यासह बांधकाम विभागाचे अधिकारी उपस्थित हाेते
दुधाळ जनावरे वाटपासाठी
लाभार्थी यादीला मंजुरी!
अकोला : जिल्हा परिषद समाजकल्याण समितीच्या सभेत शुक्रवारी दुधाळ जनावरे वाटप योजनेंतर्गत निवड करण्यात आलेल्या ३० लाभार्थींच्या यादीला मंजुरी देण्यात आली. त्यामुळे योजनेंतर्गत निवड करण्यात आलेल्या लाभार्थींना दुधाळ जनावरे वाटप करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
.......................................
निधी खर्चाचा ताळमेळ लावण्याची लगबग!
अकोला : ‘मार्च एन्डींग’च्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेच्या विविध विभागांतर्गत योजना व विकासकामांसाठी प्राप्त निधीतून झालेला खर्च आणि अद्याप अखर्चित असलेला निधी यासंदर्भात ताळमेळ लावण्याची लगबग सद्य:स्थितीत जिल्हा परिषदेच्या विविध विभागांत सुरू आहे.
...........................................
पाणीटंचाई निवारणाचे प्रस्ताव प्रलंबित!
अकोला : जिल्ह्यातील पाणीटंचाई निवारणासाठी करावयाच्या उपाययोजनांच्या कृती आराखड्यास जिल्हाधिकाऱ्यांकडून ८ मार्च रोजी मंजुरी देण्यात आली. परंतु कृती आराखड्यातील प्रस्तावित पाणीटंचाई निवारणाच्या उपाययोजना कामांचे प्रस्ताव प्रशासकीय मान्यतेसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर करण्याची प्रक्रिया अद्याप प्रलंबित आहे.
....................................................
कोविड केअर सेंटरमधील व्यवस्थेचा आढावा!
अकोला : कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग नियंत्रित करण्यासाठी कोरोनाबाधित रुग्णांवर उपचारासाठी अकोला शहरात सुरू करण्यात आलेल्या कोविड केअर सेंटरमधील सोयी-सुविधांचा आढावा अकोल्याचे उपविभागीय दंडाधिकारी डाॅ. नीलेश अपार यांनी शनिवारी संबंधित अधिकाऱ्यांकडून घेतला
.---------------------
शरबती गहूची आवक
शरबती गहूची आवक
अकोला : जिल्ह्यात गहू काढणीचा हंगाम सुरू आहे. बाजार समितीत लोकल गहूसोबत शरबती गहूची आवक सुरू झाली आहे. शनिवारी ६८ क्विंटल आवक झाली. शरबती गव्हाला कमीतकमी २१००, जास्तीतजास्त २४०० रुपये व सर्वसाधारण २३०० रुपये दर मिळाला. काही दिवसांत आवक आणखी वाढणार असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.
----------------------------------------------
बाजारात संत्र्याचा तुटवडा
अकोला : बाजारात संत्र्याला मोठी मागणी आहे. मागणीनुसार आवक होत नसल्याने संत्र्यांचा तुटवडा जाणवू लागला आहे. १२० रुपये किलो दराने मिळणारा संत्रा आता २०० रुपये किलो दराने मिळत आहे. अनेक फळ व्यापाऱ्यांकडे संत्रा नाही. बाजारात संत्रा उपलब्ध होताच भाव पूर्वस्थितीत येणार असल्याचे फळ व्यावसायिकांनी सांगितले.
-----------------------------------------------------