मुंडगाव आरोग्य केंद्रामध्ये लसीकरणासाठी गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:23 AM2021-07-07T04:23:33+5:302021-07-07T04:23:33+5:30

मुंडगाव : येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात ५ जुलै रोजी १८ ते ४० वर्ष वयोगटातील कोविड-१९च्या लसीकरणाच्या पहिल्या डोससाठी मोठ्या ...

Crowd for vaccination at Mundgaon Health Center | मुंडगाव आरोग्य केंद्रामध्ये लसीकरणासाठी गर्दी

मुंडगाव आरोग्य केंद्रामध्ये लसीकरणासाठी गर्दी

Next

मुंडगाव : येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात ५ जुलै रोजी १८ ते ४० वर्ष वयोगटातील कोविड-१९च्या लसीकरणाच्या पहिल्या डोससाठी मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून आली. त्यामुळे उपलब्ध लसीचे डोस १६० व उपस्थित लाभार्थी अंदाजे २०० ते २५०च्या जवळपास दिसून आले. नियोजन नसल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.

प्रा. आरोग्य केंद्रामध्ये लसीकरण करणाऱ्या लाभार्थींचे रजिस्टर नोंदणी ऑनलाइन करणे व नंतर लस घेणे व अशातच खासगी व्यक्तीकडून लाभार्थींचे नाव नोंदणी करणे, त्यामुळे लाभार्थींना खूप त्रास सहन करावा लागत आहे. लस घेण्यासाठी लाभार्थी हे सकाळपासून लाइनमध्ये उभे राहून त्रास सहन करीत आहेत. या अगोदर लाभार्थींना जेवढा लसीकरण साठा उपलब्ध आहे, तेवढे टोकन देण्यात येत होते व लसीकरण सुरळीत होत होते. परंतु आता लसीकरणाकरिता नियोजन नसल्यामुळे महिला व पुरुष यांची प्राथमिक आरोग्य केंद्रावर मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याचे दिसून आले.

फोटो:

वैद्यकीय अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे

वैद्यकीय अधिकाऱ्यांनी लसीकरण सत्राला नियोजन करून व्यवस्थितपणे लसीकरण करून घ्यावे व जनतेला होणारा त्रास दूर करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

Web Title: Crowd for vaccination at Mundgaon Health Center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.