किराणा मार्केटमध्ये नागरिकांची गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2021 04:21 AM2021-02-24T04:21:03+5:302021-02-24T04:21:03+5:30
वातावरणातील बदलाचा आरोग्याला फटका अकोला: वातावरणातील बदलामुळे अनेकांमध्ये सर्दी, खोकल्याचे लक्षणे दिसून येत आहेत. त्यामुळे आपल्याला तर कोरोना झाला ...
वातावरणातील बदलाचा आरोग्याला फटका
अकोला: वातावरणातील बदलामुळे अनेकांमध्ये सर्दी, खोकल्याचे लक्षणे दिसून येत आहेत. त्यामुळे आपल्याला तर कोरोना झाला नाही, ना अशी भीती अनेकांमध्ये दिसून येत आहे. कोरोनाच्या भीतीने अनेक जण चाचणी करण्यासही घाबरताना दिसून येत आहे.
लॉकडाऊनमध्येही गल्ली बोळीत गर्दी
अकोला: कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता अकोल्यात लॉकडाऊन लावण्यात आले आहे. मात्र, तरी देखील अनेक जण रस्त्यावर फिरताना दिसून येत आहेत. अनेक जण विनामास्क गल्ली बोळीतील चौकांवर गर्दी करत असल्याचे दिसून येत आहे.
नॉनकोविड रुग्णांमध्ये वाढ
अकोला: जिल्ह्यात सर्वत्र कोविड रुग्णांसोबतच नॉनकोविड रुग्णांचीही संख्या वाढत आहे. सर्वोपचार रुग्णालयात नॉनकोविड ओपीडीमध्ये येणाऱ्या रुग्णांचे प्रमाणही लक्षणीय आहे. कोविड आणि नॉनकोविड रुग्णांची संख्या वाढत असल्याने जीएमसीवर ताण वाढत आहे.