चाचणीसाठी नागरिकांची गर्दी; १६५२ जणांनी दिले नमुने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2021 04:19 AM2021-03-31T04:19:04+5:302021-03-31T04:19:04+5:30

महापालिकेची दमछाक शहरात काेराेनाचे सर्वाधिक रुग्ण पूर्व, पश्चिम व दक्षिण झाेनमध्ये आढळून येत आहेत. शहराच्या कानाकाेपऱ्यात काेराेनाचा संसर्ग पसरल्यामुळे ...

Crowds of citizens for testing; Samples given by 1652 people | चाचणीसाठी नागरिकांची गर्दी; १६५२ जणांनी दिले नमुने

चाचणीसाठी नागरिकांची गर्दी; १६५२ जणांनी दिले नमुने

Next

महापालिकेची दमछाक

शहरात काेराेनाचे सर्वाधिक रुग्ण पूर्व, पश्चिम व दक्षिण झाेनमध्ये आढळून येत आहेत. शहराच्या कानाकाेपऱ्यात काेराेनाचा संसर्ग पसरल्यामुळे मनपाने झाेननिहाय चाचणी केंद्रांसह फिरत्या वाहनांची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. पाॅझिटिव्ह रुग्णांवर लक्ष ठेवणे, संशयित रुग्णांना हाेम क्वारंटाईनची परवानगी देणे, चाचणी केंद्रांमध्ये जमा केलेले नमुने तपासणीसाठी पाठविणे व त्यानंतर पुन्हा पाॅझिटिव्ह रुग्णांची उपचारासाठी मनधरणी करणे अशा अनेक कामांचा ताण मनपा कर्मचाऱ्यांवर आला आहे.

शहरात २१ पाॅझिटिव्ह

जिल्हा सामान्य रुग्णालय प्रशासनाकडून मनपाला मंगळवारी प्राप्त झालेल्या अहवालानुसार शहरात २१ जणांना काेराेनाची लागण झाली आहे. यामध्ये पूर्व झाेन अंतर्गत ११, पश्चिम झोन २, उत्‍तर झोन १ आणि दक्षिण झोन अंतर्गत ७ असे एकुण २१ नागरिकांचे अहवाल पॉझिटिव्‍ह आहेत.

Web Title: Crowds of citizens for testing; Samples given by 1652 people

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.