जमावबंदीत रस्त्यांवर गर्दी कायमच!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2021 04:17 AM2021-04-12T04:17:02+5:302021-04-12T04:17:02+5:30
अकोला : कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग नियंत्रित करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार जिल्ह्यात दिवसा जमावबंदी आणि रात्रीची कडक निर्बंध लागू करण्यात ...
अकोला : कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग नियंत्रित करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार जिल्ह्यात दिवसा जमावबंदी आणि रात्रीची कडक निर्बंध लागू करण्यात आले; मात्र शहरातील बाजार परिसर तसेच विविध सार्वजनिक ठिकाणी रस्त्यांवर नागरिकांची होणारी गर्दी कायमच असल्याचे चित्र रविवारी दिसून आले.
---
दुधाची गुणवत्ता घसरली; आरोग्य धोक्यात
अकोला : दूध उत्पादन वाढवून अधिकाधिक अर्थार्जन मिळविण्यासाठी जिल्ह्यात दुधाळ पशूंना संप्रेरकांची इंजेक्शन टोचणे, दुधात भेसळ करणे आदी प्रकार प्रचंड वाढले आहेत. त्यामुळे स्वच्छ दूध उत्पादन प्रक्रिया ढासळली असून, गाई, म्हशी तसेच मानवी आरोग्य धोक्यात आले आहे.
-------------------------------------
आवार भिंतीलगत अतिक्रमण
अकाेला : स्थानिक बसस्थानक आवाराच्या भिंतीलगत काही विक्रेत्यांनी अतिक्रमण केल्याचे दिसून येते. परिसरात रिक्षा दुरुस्तीची दुकानेही भिंतीलगत उभारण्यात आली आहेत. या प्रकाराकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे.
----
सोयाबीनची आवक वाढली
अकोला : अतिवृष्टीमुळे सोयाबीनचे पीक खराब झाले. त्यामुळे उत्पादनातही घट पहावयास मिळाली. कृषी उत्पन्न बाजार समितीत अजूनही आवक सुरू आहे. सोयाबीनला चांगला भाव मिळत असल्याने शेतकरी सोयाबीन विक्रीसाठी आणत असल्याचे चित्र आहे.
-------
लसीकरणासाठी पुढाकार घ्या!
अकाेला : कोरोनाला रोखण्यासाठी जिल्ह्यात ४५ वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण सुरू आहे. दरम्यान, लसीचा तुटवडा निर्माण झाल्याने लसीकरण मोहीम बंद पडली आहे. लस पूर्णपणे सुरक्षित असून, लसीकरणासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.
-----
पेट्राेल-डिझेलची अवैध विक्री
अकाेला : जिल्ह्यात पेट्रोल, डिझेलची अवैध विक्री वाढली आहे. गत आठवड्यात बाळापूर तालुक्यातील हातरुण येथून पेट्रोल, डिझेल जप्त केल्याची कारवाई केली होती. उन्हाळ्याच्या दिवसात कॅनमध्ये पेट्रोल वाहून नेणे धोकादायक ठरू शकते. त्यामुळे पेट्रोल, डिझेलच्या अवैध विक्रीवर कारवाईची मागणी होत आहे.
------------------------------------------------------
प्लॅस्टिकचा वापर वाढला!
अकोट : प्लॅस्टिक किंवा कॅरिबॅगवर बंदी असताना वापर जास्त प्रमाणात होत असल्यामुळे जनावरांचे आरोग्य धोक्यात येत आहे. याकडे लक्ष देण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात आली आहे.
-----
वीजवाहिन्यांना फांद्यांचा स्पर्श
अकोला : शहरातील खरप बु. येथे वीजवाहिन्यांना झाडांचा स्पर्श होत असल्याने वीजपुरवठा वारंवार खंडित होत असल्याचे प्रकार वाढले आहे. याकडे महावितरणचे दुर्लक्ष होत आहे. वीजपुरवठा खंडित होत असल्याने नागरिकांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे.