लाचखोर उंबरकारने केली न्यायालयाची दिशाभूल?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2017 01:11 AM2017-09-22T01:11:44+5:302017-09-22T01:11:44+5:30
अकोला : महावितरण कंपनीच्या ग्रामीण विभागाचा लाचखोर कार्यकारी अभियंता देवेंद्र सुपडा उंबरकार याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सोमवारी अटक केल्यानं तर त्याने मंगळवारी जामिनासाठी न्यायालयाकडे अर्ज करी त, कंत्राटदाराकडून घेतलेली रक्कम लाच म्हणून नव्हे, तर सुरक्षा अनामत म्हणून मागितल्याचा युक्तिवाद करून न्यायालयाचीही दिशाभूल केल्याची माहिती प्राप्त झाली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क

कार्यकारी अभियंता देवेंद्र उंबरकार (३७) याने ८ सप्टेंबर रोजी खासगी विद्युत कंत्राटदाराला इलेक्ट्रिक कामाचे पाच लाख रुपयांच्या कंत्राटाची वर्कऑर्डर देण्यासाठी ५0 हजार रुपयांची लाच मागितल्याची तक्रार कंत्राटदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली होती. त्यानुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सोमवारी रात्री उंबरकार याला अटक केली. मंगळवारी त्याला न्यायालयात हजर करण्यात आले. उंबरकार याने जामिनासाठी न्यायालयात अर्ज दाखल केला होता. त्याच्या जामीन अर्जावरील सुनावणीदरम्यान उंबरकारने कंत्राटदाराकडून ५0 हजार रुपयांची लाच घेतली नसून, ती रक्कम सुरक्षा अनामत म्हणून घेतल्याचा युक्तिवाद केला; परंतु वस्तुस्थिती मात्र वेगळीच आहे. तक्रारदार कंत्राटदाराने ५0 हजार रुपयांची बँक गॅरंटी १९ एप्रिल २0१७ रोजीच सादर केली असल्यामुळे सुरक्षा रक्कम देण्याचे कोण तेही प्रयोजनच नव्हते. लाचखोर उंबरकार याने न्यायालयात खोटी माहिती सांगून न्यायालयाची दिशाभूल केल्याचे यावरून स्पष्ट होते.