गुरांची निर्दयतेने कत्तल, आरोपीस एक वर्षाचा कारावास
By राजेश शेगोकार | Published: April 18, 2023 03:47 PM2023-04-18T15:47:58+5:302023-04-18T15:48:52+5:30
एक वर्षाच्या कारावासासह पाच हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे.
राजेश शेगाेकार, अकोला: अकाेल्यातील माेमीनपुरा भागात गुरांची निर्दयतेने कत्तल करणाऱ्या आराेपीला येथील जिल्हा न्यायालयाने एक वर्षाच्या कारावासासह पाच हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे.
दि.२९ नोव्हेंबर २०१५ रोजी रामदास पेठ पोलिस ठाण्यातील सहायक पोलिस निरीक्षक तिरुपती राणे पथकासह पेट्रोलिंग करत असताना सकाळी ६:३० वाजता दरम्यान आरोपी नामे इरफान कुरेशी शे. गफूर कुरेशी, (रा. मोमिनपुरा, अकोला) हा त्याच्या ताब्यातील गोवंश जातीचे जनावरास निर्दयतेने धारदार शस्त्राद्वारे कापून जीवे मारल्याचे दिसून आले. या प्रकरणात रामदास पेठ पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यास अटक केली.
पोलिसांनी दि.२० नोव्हेंबर २०१६ रोजी तपास पूर्ण करून व आरोपीच्याविरोधात सबळ पुरावे मिळून आल्याने रामदासपेठ पोलिसांनी दोषारोप पत्र न्यायालयात दाखल केले. या प्रकरणात साक्षीदारांचे जबाब नोंदविण्यात आले. मुख्य न्यायदंडाधिकारी एस. एस. बांगड यांनी आरोपीविरुद्ध सबळ पुरावे व सरकार पक्षाची बाजू लक्षात घेता आरोपीस साेमवारी एक वर्ष सक्त कारावासाची शिक्षा व पाच हजार रुपये दंड ठोठावला. या प्रकरणात सरकार पक्षाच्या वतीने सहायक सरकारी विधिज्ञ विद्या सोनटक्के यांनी बाजू मांडली, तर पैरवी अधिकारी म्हणून पो. हवा. राजेंद्र पाटील, राजकुमार गणवीर यांनी सहकार्य केले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"