सात हजार हेक्टरवरील पिकांना तडाखा!

By admin | Published: August 5, 2016 01:38 AM2016-08-05T01:38:03+5:302016-08-05T01:38:03+5:30

अकोला जिल्ह्यातील प्राथमिक अहवाल विभागीय आयुक्तांकडे दाखल.

Crush the crops on seven thousand hectares! | सात हजार हेक्टरवरील पिकांना तडाखा!

सात हजार हेक्टरवरील पिकांना तडाखा!

Next

अकोला: जिल्हय़ातील पाच तालुक्यात ६ हजार ८८४ हेक्टरवरील पिकांना पाऊस आणि पुराचा तडाखा बसला असून, पीक नुकसानाचा प्राथमिक अहवाल बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत विभागीय आयुक्तांकडे सादर करण्यात आला आहे.
संततधार पाऊस आणि नदी-नाल्यांना पूर आल्याने जिल्हय़ात नदीकाठच्या गावांमधील शेतात पाणी साचले आहे.
त्यामुळे पाण्याखाली आलेल्या पिकांचे नुकसान झाले आहे.
यावर्षीच्या पावसाळ्यात गत १ जून ते ३ ऑगस्ट या कालावधीत पाऊस आणि नदी-नाल्यांना आलेल्या पुरामुळे जिल्हय़ातील अकोला, आकोट, बाळापूर, बाश्रीटाकळी व तेल्हारा या पाच तालुक्यात ६ हजार ८८४ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे.
त्यामध्ये मूग, उडीद, सोयाबीन, कापूस व ज्वारी इत्यादी पिकांच्या नुकसानाचा समावेश आहे. संबंधित तहसीलदारांच्या प्राथमिक अहवालानुसार जिल्हय़ातील पीक नुकसानाचा प्राथमिक अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत ३ ऑगस्ट रोजी अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयाकडे सादर करण्यात आला.
वीज पडून आणि पुरात वाहून गेल्याने जिल्हय़ात सात जणांचा मृत्यू झाल्याचेही अहवालात नमूद करण्यात आले आहे.

Web Title: Crush the crops on seven thousand hectares!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.