सीएसह चार डॉक्टरांचे निलंबन रद्द
By admin | Published: January 12, 2017 03:59 AM2017-01-12T03:59:45+5:302017-01-12T03:59:45+5:30
राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) अकोला विभागातील २६ चालकांना रंगअंधत्वाची बनावट प्रमाणपत्रे
Next
अकोला/ वाशिम : राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) अकोला विभागातील २६ चालकांना रंगअंधत्वाची बनावट प्रमाणपत्रे दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आर. एच. गिरी व अन्य वैद्यकीय अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले होते. तथपि, आरोग्य विभागाकडून बुधवारी हे निलंबन रद्द करण्यात आले.
अकोला व वाशिम आगारात कार्यरत २६ चालकांनी रंगअंधत्वाची प्रमाणपत्रे सादर करून सुरक्षारक्षकपदावर नियुक्ती मिळविली होती. यापैकी एका चालकास मुंबई येथे वैद्यकीय तपासणीत कोणताही आजार नसल्याचे समोर आले. (प्रतिनिधी)