सांस्कृतिक कार्यक्रमांनी वाढली महोत्सवाची रंगत!
By admin | Published: March 5, 2017 02:04 AM2017-03-05T02:04:02+5:302017-03-05T02:04:02+5:30
लोणार पर्यटन महोत्सव; नृत्य, नाटिकेतून दिला एकात्मतेचा संदेश.
लोणार, दि. ४- तीन दिवसीय लोणार महोत्सवाच्या दुसर्या दिवशी सांस्कृतिक कार्यक्रमाची मेजवानी पर्यटकांना मिळाली. स्थानिक कलाकारांनी अप्रतिम कलाकृती सादर करत प्रेक्षकांना आकर्षीत केले. नृत्य, नाटिकाद्वारे ह्यलेक वाचवा, लेक शिकवाह्ण तसेच शेतकरी आत्महत्या थांबविण्याचा संदेश चिमुकल्यांनी दिला.
सांस्कृतिक कार्यक्रमाचे उद्धघाटन लोणार नगर परिषद नगराध्यक्ष भूषण मापारी यांचे हस्ते करण्यात आले. भारतीय सैन्यामुळेच आपण येथे सुरक्षित आणि आनंदात जीवन जगू शकतो, असा संदेश देणारी नाटिका चिमुकल्यांनी सादर केली. या नाटिकेत त्यांनी सैनिकांची शौर्यगाथा मांडली. नाटिकेच्या शेवटी दहशतवाद्दांच्या हल्ल्यात जवान शहीद झाल्यानंतर त्याला मानवंदना दिल्या जाते. त्यावेळेस प्रेक्षकवर्ग उभा राहिला आणि ओल्या डोळ्यांनी मानवंदना दिली. या शिवाय अनेक सांस्कृतिक कार्यक्रमाची रेलचेल होती. या कार्यक्रमांधून राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देण्यात आला. लोणार पर्यटन महोत्सवामध्ये बालकलाकारांनी सादर केलेल्या सांस्कृतीक कार्यक्रमाची मेजवानी पर्यटकांना अनुभवायला मिळाली.