ज्येष्ठांकडून मिळालेली संस्कृती व संस्कार आचरणात आणावे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2021 04:14 AM2021-07-04T04:14:04+5:302021-07-04T04:14:04+5:30

स्थानिक सहकार नगर येथे शिवस्मारक समितीतर्फे कै. नानासाहेब जायले यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ ज्येष्ठ नागरिकांच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. ...

The culture and rites received from the elders should be put into practice! | ज्येष्ठांकडून मिळालेली संस्कृती व संस्कार आचरणात आणावे!

ज्येष्ठांकडून मिळालेली संस्कृती व संस्कार आचरणात आणावे!

Next

स्थानिक सहकार नगर येथे शिवस्मारक समितीतर्फे कै. नानासाहेब जायले यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ ज्येष्ठ नागरिकांच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आ. बाजाेरिया यांनी शिवस्मारक समितीतर्फे प्रास्तावित ईको पार्कसाठी आमदार निधीतून दहा लाखांची मदत जाहीर केली. कार्यक्रमाला नगरसेवक मंगेश काळे, रवींद्र भन्साली, श्रीमती सविताताई जायले, श्रीमती माई गावंडे, संगीता केदार यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी वृक्षारोपण तसेच ओपन जिमचा लोकार्पण सोहळा पार पडला. रघुनाथ कोल्हे, विजय खंडाळकर, बाबासाहेब जोशी, सुरेंद्रसिंग ठाकूर, हसमुख गढिया, किशोरसिंग मोहता, श्रीकृष्णजी चांडक, साहेबराव चोरे, बन्सिधर डिडोळकर, डॉ. नंदकिशोर तोष्णीवाल, केशवराव गावंडे, विश्वनाथ शिरेकर, डॉ. वासुदेव शेकार, केशव गायकवाड, सुधाकर पसारकर, शालिग्राम पजई, विश्वास देशमुख, चंद्रकांत तराळ, गोविंद मांडवे आदी ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शरद कोकाटे यांनी तर आयोजनामागची भूमिका पंकज जायले यांनी विशद केली. कार्यक्रमाचे संचालन अनंत गावंडे व प्रभाकरराव रुमाले यांनी केले तर आभार चेतन ढोरे यांनी मानले. याप्रसंगी तुषार जायले, पवन महल्ले, अवि गावंडे, गोपी चाकर, अनिल विखे, आनंद सुकळीकर, शेखर शेळके, विवेक ठोसर, मनीष सरडे, प्रदीप गावंडे, नंदकिशोर चतरकर, आनंद रावणे, संजय शिरेकर, बबलू पाटील विखे, शिवराज खंडाळकर, अमित ठाकरे, व्यंकटेश दांदळे आदी उपस्थित हाेते.

Web Title: The culture and rites received from the elders should be put into practice!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.