जिल्ह्यात जमावबंदी लागू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2021 04:20 AM2021-02-16T04:20:23+5:302021-02-16T04:20:23+5:30
हाॅटेल, पानठेले, चहा टपरी, चौपाटी इत्यादी सार्वजनिक ठिकाणी मास्कचा वापर आणि ‘फिजिकल डिस्टन्सिंग’चे पालन करणे आवश्यक आहे, तसेच नागरिकांची ...
हाॅटेल, पानठेले, चहा टपरी, चौपाटी इत्यादी सार्वजनिक ठिकाणी मास्कचा वापर आणि ‘फिजिकल डिस्टन्सिंग’चे पालन करणे आवश्यक आहे, तसेच
नागरिकांची गर्दी होऊ नये, यासाठी स्थानिक प्रशासनाने प्रतिबंधात्मक उपाययोजना करून, नियमांचे उल्लंघन केल्याचे आढळून आल्यास संबंधित व्यावसायिक व दुकानदारांवर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
‘नो मास्क, नो एन्ट्री!’
खासगी आस्थापना , दुकाने इत्यादी ठिकाणी मास्क किंवा फेस कव्हर असलेल्या व्यक्तींनाच प्रवेश देण्यात देण्यात येणार आहे. हाॅटेलच्या आतमध्येही मास्कचा वापर करणे बंधनकारक राहणार आहे. या संदर्भात दर्शनी भागात फलक लावणे आवश्यक असून, नियमांचे उल्लंघन केल्याचे आढळून आल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.
तपासणी, कारवाईचे निर्देश!
जमावबंदी आदेशाच्या अंमलबजावणीत महानगरपालिका क्षेत्रात मनपा आयुक्त, नगरपालिका क्षेत्रात मुख्याधिकारी व इतर क्षेत्रांमध्ये उपविभागीय दंडाधिकारी, तालुका दंडाधिकाऱ्यांनी वेळोवेळी तपासणी करून, नियमानुसार कारवाई करण्याचे निर्देशही जिल्हाधिकाऱ्यांनी आदेशात दिले आहेत.