आता दर रविवारी संपूर्ण तर दरराेज रात्री संचारबंदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2021 04:51 AM2021-02-20T04:51:27+5:302021-02-20T04:51:27+5:30

अकोला - जिल्ह्यात कोरोना संसर्गाचा वाढता प्रादुर्भाव पाहता जिल्हा प्रशासनाने कडक उपाययोजना केल्या आहेत. त्यासाठी आता पुढील आदेश येईपर्यंत ...

Curfew now every Sunday and every night | आता दर रविवारी संपूर्ण तर दरराेज रात्री संचारबंदी

आता दर रविवारी संपूर्ण तर दरराेज रात्री संचारबंदी

Next

अकोला - जिल्ह्यात कोरोना संसर्गाचा वाढता प्रादुर्भाव पाहता जिल्हा प्रशासनाने कडक उपाययोजना केल्या आहेत. त्यासाठी आता पुढील आदेश येईपर्यंत दर रविवारी संपुर्ण संचारबंदी तसेच दररोज रात्रीची संचारबंदी, वाहनांतून प्रवास करतांना वाहनातील प्रवाशी संख्येवर मर्यादा, गर्दीच्या ठिकाणी कोरोणा प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे पालन या व अन्य बाबींवर जोर देण्यात आला आहे. यासंदर्भातील आदेश आज सायंकाळी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी निर्गमित केले आहेत.

या आदेशात म्हटल्यानुसार,

१) पुढील येणाऱ्या प्रत्‍येक रविवारी म्हणजेच शनिवारचे रात्री ०८.०० ते सोमवारचे सकाळी ०६.०० वाजेपर्यंत संपूर्ण अकोला जिल्ह्यात पुढील आदेशापर्यंत संपूर्णतः संचारबंदी लागू करण्‍यात आले आहे. या कालावधीत कोणत्‍याही व्‍यक्‍तीस मुक्‍त संचार करता येणार नाही.तसेच दरराेज रात्रीची संचारबंदी लागु केली आहे

यांना सवलत

अ) रूग्वाहिका

आ) रात्रीच्‍या वेळेस सुरु राहणारी औषधांची दुकाने.

इ) ठोक भाजीपाला विक्री, दुध व दुग्‍धजन्‍य पदार्थ विक्री करणाऱ्या डेअरी.

ई) रेल्‍वेने तसेच एस.टी. बस व प्रायव्‍हेट लक्‍झरीने उतरणाऱ्या प्रवाश्यांकरिता ऑटोरिक्‍शा.

उ) हायवेवरील पेट्रोल पंप व ढाबे.

ऊ) एम.आय.डी.सी. क्षेत्रातील उद्योगात जाण्यासाठी कर्मचारी कामगार यांना संचाबंदीच्‍या कालावधीत त्‍यांच्‍या कार्यालयातील ओळखपत्राचे आधारे जाण्‍या-येण्‍याकरिता परवानगी राहील

सक्तीचे नियम

जिल्‍हयातील महानगरपालिका सर्व नगर परिषद व नगर पंचायती क्षेत्रातील या आठवड्यात भरविण्‍यात येणारे आठवडी बाजार पुढील आदेशापर्यंत बंद करण्‍यात येत आहेत.

लग्‍नसंमारंभाकरिता केवळ ५० व्‍यक्‍तींनाच उपस्थित राहता येईल. तसेच लग्‍नसमारंभाकरिता रात्री ८.०० वाजेपर्यंतच खालील नमूद केल्‍याप्रमाणे परवानगी आयोजकाने लग्‍नाचे स्‍थळ तसेच किती लोक उपस्थित राहणार आहेत याची माहिती संबंधीत पोलीस स्‍टेशन यांना कळविणे बंधनकारक राहील.

चारचाकी वाहनामध्‍ये १ ड्रायव्‍हर व ३ व्‍यक्‍ती व ऑटोरिक्‍शा वाहनामध्‍ये १ ड्रायव्‍हर व २ सवारी यांनाच परवानगी राहील.

सर्व प्रकारची दूकाने सकाळी ६ ते रात्री ८ या कालावधीत सुरु राहतील.

जिल्ह्यामधील सर्व शाळा व महाविद्यालये , सर्व प्रकारची खाजगी शैक्षणीक प्रशिक्षण केन्‍द्रे, खाजगी शिकवणी वर्ग, कोचिंग क्‍लासेस दि.२८ फेब्रुवारी २०२१पर्यंत बंद ठेवण्‍यात येत आहेत. या कालावधीत ऑनलाईन/दुरस्‍थ शिक्षण यांना परवानगी राहील व त्‍याला अधिक वाव देण्‍यात यावा.

Web Title: Curfew now every Sunday and every night

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.