तेल्हारा शहरासह तालुक्यात संचारबंदी पालन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2021 04:27 AM2021-02-23T04:27:59+5:302021-02-23T04:27:59+5:30
कोरोनाची रुग्णांची संख्या घटल्यामुळे कोरोना संपल्याच्या अविर्भावात नागरिक वावरत होते. शिवाय सर्वच लहान, मोठे व्यवसाय पूर्ववत सुरू झाले होते. ...
कोरोनाची रुग्णांची संख्या घटल्यामुळे कोरोना संपल्याच्या अविर्भावात नागरिक वावरत होते. शिवाय सर्वच लहान, मोठे व्यवसाय पूर्ववत सुरू झाले होते. फिजिकल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला होता. शहरासह ग्रामीण भागात जागोजागी नागरिकांची गर्दी दिसून येत होती. सध्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी रविवारी संचारबंदीचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी काढले. त्यानुसार तेल्हारा शहरात स्थानिक पोलीस प्रशासन, महसूल विभाग, पालिका प्रशासन यांच्या नेतृत्वाखाली कडेकोड बंदोबस्त ठेवण्यात आला. शहरातील सर्वच दुकाने आज सकाळपासून पूर्णपणे बंद असून संपूर्ण रस्ते निर्मनुष्य दिसून आले.तर सकाळ संध्याकाळ येणारे जाणारे प्रवासांच्या वाहतूक तुरळक प्रमाणात दिसत होती. पोलिसांचे फिरते पथक नागरिकांना घरातच बसण्याचे आवाहन करीत होते. तसेच तालुक्यातील ग्रामीण भागात सकाळी काही ठिकाणी तुरळक प्रमाणात दुकाने सुरू होती, मात्र अनेक ठिकाणी किराणा दुकानदार व लघु व्यावसायिकांनी स्वस्फूर्तीने संचारबंदीचे पालन केल्याचे दिसून आले. तेल्हारा पोलीस स्टेशनचे ठाणेदार दिनेश शेळके यांच्या नेतृत्वाखाली पोलीस बंदोबस्त लावण्यात आला. तसेच तहसीलदार राजेश गुरव, गटविकास अधिकारी चव्हाण, नगर परिषदचे मुख्याधिकारी गोपीचंद पवार यांनी कोरोनाबाबतीत जनजागृती करून विनाकारण घराबाहेर पडू नये तसेच मास्कचा वापर करावा, असे आवाहन केले.