इंग्रज अकोल्यात छापत होते चलनी नोटा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2021 04:13 AM2021-07-12T04:13:16+5:302021-07-12T04:13:16+5:30

जेम्स विल्सन यांनी केली होती पाहणी ईस्ट इंडिया कंपनीचे वित्तीय संचालक जेम्स विल्सन यांनी १८५९ साली नोटांची छपाई करण्याचा ...

Currency notes were printed in English Akola | इंग्रज अकोल्यात छापत होते चलनी नोटा

इंग्रज अकोल्यात छापत होते चलनी नोटा

Next

जेम्स विल्सन यांनी केली होती पाहणी

ईस्ट इंडिया कंपनीचे वित्तीय संचालक जेम्स विल्सन यांनी १८५९ साली नोटांची छपाई करण्याचा निर्णय घेतला. त्यापूर्वी नोटांऐवजी नाण्यांचा वापर चलनात होत असे. जेम्स विल्सन यांनी स्वतः अकोला येथे येऊन जागेची व शहराची पाहणी केली होती. अकोला हे रेल्वेमार्गावरील एक प्रमुख शहर असल्याने त्यांनी अकोल्यात नोटा छपाई करण्यास मंजुरी दिली होती.

अशा होत्या नोटा

या नोटांवर डाव्या व उजव्या बाजूस नोटेचा सिरीयल नंबर टाकलेला असायचा आणि ६ भाषांमधून मजकूर असायचा. अकोल्यात छापल्या जाणाऱ्या नोटांवर उर्दू, गुजराती, मराठी, कन्नड व इंग्रजी या भाषांतील मजकूर असायचा. ५ रुपयांची नोट १० × १६ सेंटिमीटर आकाराची, तर १० ते १००० रुपयांची नोट १२ × १७ सेंटिमीटर आकाराची असायची.

तत्कालीन हिंदुस्थानातील कलकत्ता, अलाहाबाद, लाहोर, बॉम्बे, कराची, नागपूर, मद्रास या मोठ्या शहरांमध्ये इंग्रज चलनी नोटा छापायचे. रेल्वेमार्गावरील प्रमुख शहर म्हणून त्या काळी अकोल्यातही चलनी नोटांची छपाई करण्यात येत होती.

- अक्षय खाडे, मुद्रा संग्राहक व अभ्यासक, अकोला

Web Title: Currency notes were printed in English Akola

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.