महावितरणकडून उभ्या झाडांची कत्तल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2021 08:16 PM2021-05-18T20:16:28+5:302021-05-18T20:16:45+5:30

Murtizapur News : १८ मे रोजी चार महाकाय निंबाच्या झाडाची बुडापासून कत्तल करण्यात आली असल्याने गावकऱ्यात रोष व्यक्त करण्यात येत आहे.

Cutting of vertical trees by MSEDCL | महावितरणकडून उभ्या झाडांची कत्तल

महावितरणकडून उभ्या झाडांची कत्तल

googlenewsNext

-संजय उमक 
मूर्तिजापूर : तालुक्यातील महावितरणच्या  माना उपविभाकडून मान्सूनपूर्व झाडांच्या फांद्या तोडण्याचा कार्यक्रम हाती घेतला आहे. परंतू माना सबस्टेशन अंतर्गत येत असलेल्या माना गावातील १८ मे रोजी चार महाकाय निंबाच्या झाडाची बुडापासून कत्तल करण्यात आली असल्याने गावकऱ्यात रोष व्यक्त करण्यात येत आहे.
             माना सबस्टेशन अंतर्गत वीज तारांजवळ असलेल्या झाडांच्या फांद्या तोडून तारे जवळची जागा मोकळी करण्याचा कार्यक्रम चालू असताना त्यांनी तसे न करता मान्सूनपूर्व झाडांच्या फांद्या न छाटता शंभर - दोनशे वर्षापूर्वीचे   चार कडूनिंबाचे झाडे बुडापासून जमिनदोस्त केली आहे. शासन एकीकडे वृक्ष लागवडीची मोहीम युध्दस्तरावर राबवित असताना दुसरीकडे वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांकडून विनापरवाना महाकाय महाकाय वृक्षाची कत्तल करण्यात येत असल्याने गावकऱ्यांनी कमालीची नाराजी व्यक्त केली. यासंदर्भात माना वितरण केंद्राचे कनिष्ठ अभियंता कमलेश मस्के यांना व मूर्तिजापूर येथील उपकार्यकारी अभियंता मनोज खांडरे यांना यासंदर्भात अवगत केले असता आम्ही घटनास्थळावर जावून पाहीले नाही व झाडे बुडापासून तोडल्याची आपल्याला कल्पना नसल्याचे लोकमतशी बोलताना सांगून कानावर हात ठेवले. वास्तविक मान्सूनपूर्व नियोजन म्हणून झाडाच्या फांद्या छाटने अपेक्षित असताना त्यांच्या कडून संपूर्ण झाडाची कत्तल होत असल्याने माना येथील उपसरपंच मंगेश वानखडे यांनी तहसीलदार मूर्तिजापूर व पोलीस स्टेशन माना येथे वीज वितरण कंपनीच्या विरुद्ध तक्रार दाखल केली आहे. कुठलीही परवानगी न घेता झाडाची कत्तल करणे गंभीर बाब असून या संदर्भात संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी दिलेल्या तक्रारीत केली आहे.
 
मान्सूनपूर्व तयारी करताना आम्ही झाडे बुडापासून कधीच तोडत नाही. केवळ झाडाच्या फांद्या छाटल्या जातात. असे झाले असेल तर त्याची चौकशी करु.

-मनोज खांडरे
उपकार्यकारी अभियंता वीज वितरण कंपनी, मूर्तिजापूर
 --
सदर विभागाने ग्रामपंचायत ची आणि वनविभागाची परवानगी घेणे अपेक्षित होते.तलाठी,मंडळ अधिकारी यांचा पंचनाम्यासह अहवाल मागवून वरिष्ठ कार्यालयात सादर करण्यात येईल.

-प्रदीप पवार 
तहसीलदार, मूर्तिजापूर

Web Title: Cutting of vertical trees by MSEDCL

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.